पुढारी ऑनलाईन : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने गाझा आणि इस्रायलमध्ये तात्काळ युद्धविराम करण्याची मागणी करणारा ठराव मंजूर केला आहे. तसेच ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यादरम्यान ओलीस ठेवलेल्या सर्वांची सुटका करण्याची मागणीही यात करण्यात आली आहे. अमेरिकेने गाझामधील युद्धबंदीला पाठिंबा दिला आहे. आपला मित्र राष्ट्र अमेरिकेच्या या निर्णायावर इस्रायलने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आपल्या दोन प्रमुख सल्लागारांचा प्रस्तावित अमेरिका दौराही रद्द केला आहे.
इस्रायलने अमेरिकेला फटकारले
एका निवेदनात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, "काही दिवसांपूर्वी, त्यांनी (अमेरिकेने) सुरक्षा परिषदेच्या एका ठरावाला पाठिंबा दिला होता ज्यामध्ये ओलिसांच्या सुटकेशी युद्धबंदीच्या आवाहनाला जोडले गेले होते. चीन आणि रशियाने त्या ठरावाला काही प्रमाणात व्होटो केले कारण ते ओलिसांच्या सुटकेशी निगडीत असलेल्या युद्धविरामाला विरोध केला. तरीही आज, रशिया आणि चीनने अल्जेरिया आणि इतरांना तंतोतंत पाठिंबा दिला कारण त्यात असा कोणताही संबंध नव्हता. एक युद्धविराम जो ओलीसांच्या सुटकेवर अवलंबून नाही." इस्त्रायलने अमेरिकेने मतदानापासून दूर राहणे म्हणजे "युद्धाच्या सुरुवातीपासून सुरक्षा परिषदेतील अमेरिकेच्या सातत्यपूर्ण भूमिकेतून स्पष्टपणे बाहेर पडणे, असेही अमेरिकालात्यांनी सुनावले आहे.
व्हाईट हाऊसचे उच्च अधिकारी जॉन किर्बी म्हणाले की, इस्रायलबाबत अमेरिकेच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. पूर्वीप्रमाणेच आम्ही आजही इस्रायलला पाठिंबा देत आहोत. आम्ही इस्रायलला लष्करी उपकरणे आणि शस्त्रे देत आहोत जेणेकरून इस्रायल स्वतःचा बचाव करू शकेल. कारण पॅलेस्टिनी संघटना हमास आजही इस्रायलसाठी धोका आहे, असेही ते म्हणाले. इस्रायलमध्ये तात्काळ युद्धविराम करण्याची मागणी करणारा ठराव मंजूर केला आहे. यावेळी प्रस्तावाला व्हेटो दिलेला नाही, कारण मागील प्रस्तावांप्रमाणे ते आमच्या धोरणाच्या अगदी जवळ आहे. झामध्ये तात्पुरत्या युद्धविरामासह ओलीसांच्या सुटकेच्या करारावर भर देण्यात आला आहे. त्यांनी हमासचा निषेध न केल्यामुळे आम्ही आधीच्या ठरावांवर व्हेटो केला होता, असेही ते म्हणाले.