Israel hamas War : दहशतवादी संघटनांसाठी जागा नाही; ‘X’ची मोठी कारवाई

 Israel hamas War
 Israel hamas War
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  गेले काही दिवस इस्त्रालय-हमास हल्ला प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. याचे पडसाद जगभर उमटत आहेत. इस्त्रालयवर झालेल्या हल्ल्य़ानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' ने (पूर्वीचे ट्विटर)"दहशतवादी संघटनांसाठी 'X' वर कोणतेही स्थान नाही" असे सांगत हमासशी संलग्न असेली अनेक अकाउंट काढून टाकली आहेत. (Israel hamas War) 'X' चे सीईओ यांनी ही माहिती दिली आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. हे युद्ध केवळ शस्त्रांच्या बळावर लढले जात नाही, तर जगभरातील हमास आणि इस्रायलचे समर्थकही आपापसात लढत आहेत. अशा लढायांसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे सर्वात मोठे व्यासपीठ आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला दोन्ही बाजूचे व्हिडिओ पाहायला मिळतील. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर, तुम्हाला टॉप ट्रेंडमध्ये फक्त हमास आणि इस्रायल दिसतील. अनेक हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये आहेत, ज्यामध्ये लोक या हल्ल्याशी संबंधित माहिती शेअर करत आहेत. अशा परिस्थितीत 'X' च्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी गुरुवारी (दि.१२) एक मोठी घोषणा केली आहे.

Israel hamas War : 'X' च्या सीईओ यांचे काय म्हणणे आहे?

'X' च्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी गुरुवारी (दि.१२) सांगितले की, ""X हे सार्वजनिक संभाषणासाठी वचनबद्ध आहे, दहशतवादी संघटना किंवा हिंसक अतिरेकी गटांसाठी 'X' वर कोणतेही स्थान नाही. हमासशी संबंधित शेकडो अकाउंट आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकली आहेत. प्लॅटफॉर्म एकतर हमासशी संबंधित अकाउंट काढून टाकत आहे किंवा लेबल करत आहे. इस्रायलवर हल्ले सुरू झाल्यापासून या प्लॅटफॉर्मने लाखो सामग्रीचे लेबल लावले आहे. लिंडाने तिच्या एक्स हँडलवरून एक पत्र देखील पोस्ट केले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' च्या सीईओ लिंडा
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' च्या सीईओ लिंडा
हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news