Israel Hamas War : इस्रायलच्या हल्ल्यात हमासची खतरनाक महिला दहशतवादी ठार

Israel Hamas War : इस्रायलच्या हल्ल्यात हमासची खतरनाक महिला दहशतवादी ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : Israel Hamas War : इस्रायली लष्कर हमासच्या दहशतवाद्यांना सातत्याने लक्ष्य करत आहे. गुरुवारी 'द टाइम्स ऑफ इस्रायल'ने दिलेल्या वृत्तानुसार, गाझावरील हल्ल्यात हमासची एकमेव महिला नेता जमिला अल-शांती मारली गेली आहे. ती हमास या दहशतवादी संघटनेच्या राजकीय ब्युरोचे काम सांभाळत होती. वृत्तात हल्ल्याच्या ठिकाणाविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, फक्त असे म्हटले आहे की तो पहाटे करण्यात आला.

जमिला अल-शांती ही हमासचा सह-संस्थापक अब्देल अझीझ अल-रंतिसी याची पत्नी होती. 2004 मध्ये इस्रायली हल्ल्यात रंतिसी मारला गेला होता. जमिला 2021 मध्येच हमासच्या पॉलिटिकल ब्युरोच्या सदस्या झाली. (Israel Hamas War)

इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध अजूनही सुरूच आहे. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी गाझा पट्टीतून इस्रायलवर हमासच्या दहशतवाद्यांनी सुमारे 5,000 रॉकेट डागले. या घटनेनंतर गेल्या 12 दिवसांपासून हे रक्तरंजित युद्ध सुरू आहे. गुरुवारी (दि. 19) युद्धाचा 13वा दिवस आहे. या युद्धातील मृतांची संख्या 4,700 पेक्षा जास्त आहे. मृतांमध्ये इस्रायली आणि पॅलेस्टिनी नागरिक, इस्रायली सैनिक आणि पॅलेस्टिनी दहशतवाद्यांचा समावेश आहे. एकट्या गाझामध्ये आतापर्यंत 3,478 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. (Israel Hamas War)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news