पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील दाेन महिन्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या इस्रायल आणि हमास युद्ध आणखी चिघळेल, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. 'अल जझीरा'ने दिलेल्या वृत्तानुसार इस्रायली सैन्याने शनिवारी (दि.१६ डिसेंबर) उत्तर गाझामधील आणखी एका रुग्णालयाच्या इमारतीवर बुलडोझर फिरवला आहे. कमल अडवान हॉस्पिटलबाहेर आश्रय घेतलेल्या १२ हून अधिक रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. अनेक पॅलेस्टिनी नागरिक जखमी झाले आहेत. (Israel-Hamas War)
'अल जझीरा'चे पत्रकार अनस अल-शरीफ आपल्या 'X' वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "एक भयंकर हत्याकांड आणि अवर्णनीय दृश्ये आहेत. गाझा शहरातील कमल अडवान हॉस्पिटलमध्ये इस्रायली बुलडोझरने केले ते नागरिक आणि वैद्यकीय कर्मचार्यांच्या विरोधात एक भयानक गुन्हा आहे. आजारी आणि जखमी लोकांना जिवंत गाडण्यात आले. कब्जाने बुलडोझरने रुग्णालयाच्या आवारातील विस्थापित लोकांचे तंबुवर बुलडोझर फिरवला आणि त्यांना क्रूरपणे चिरडले. अनस अल-शरीफ यांनी एक व्हिडिओही शेअर केला असून, लोकांना पळून जाण्याची संधी मिळण्यापूर्वी इस्रायली सैन्याने बुलडोझर फिरवल्याचा दावा त्यांनी केला.
हेही वाचा