Ghulam Nabi azad : ‘इस्लाम 1500 वर्षांपूर्वी पासून नाही तर…’; गुलाम नबी आझाद यांचे ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण

Ghulam Nabi azad : ‘इस्लाम 1500 वर्षांपूर्वी पासून नाही तर…’; गुलाम नबी आझाद यांचे ‘त्या’ वक्तव्यावर स्पष्टीकरण
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: "माझे ते विधान हिंदू-मुस्लिम ऐक्यासंदर्भात होते," असे म्हणत डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे (डीपीएपी) नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी व्हायरल व्हिडिओतील आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.  "सर्व मुसलमान आधी हिंदू होते. काश्मीरमधील सर्व मुसलमान पूर्वी काश्मिरी पंडितच होते. इस्लाम फक्त 1500 वर्षांपूर्वी आला आहे " या त्यांच्या वक्तव्यासाठी ते वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. तसेच सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले होते. त्यांच्या व्हिडिओमुळे अनेकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण (Ghulam Nabi azad) झाली होती. त्यानंतर आता त्यांनी त्यांच्या या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिले आहे.

गुलाम नबी आझाद यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ हा डोडातील चिरल्ला गावात एका सरकारी शा‍ळेत ९ ऑगस्ट रोजी आयोजित सभेला संबोधित करतानाचा होता. त्यांच्या या विधानाला पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनीही विरोध केला होता. त्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी या विधानावर संपूर्ण गोष्ट व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलेली नाही, असे म्हणत या वादावर आझाद यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हे विधान हिंदू आणि मुस्लिमांच्या ऐक्याबाबत (Ghulam Nabi azad) केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

गुलाम नबी आझाद म्हणाले. 'मी म्हणालो की हिंदू धर्म खूप जुना आहे आणि हे सत्य आहे. कारण इस्लामचा उगम भारतात झाला नाही. अनेक शतकांपूर्वी इस्लाम इतर देशांमध्ये विस्तारला. तसाच तो भारतातही पोहोचला. याशिवाय गुलाम यांनी हे देखील सांगितले की इस्लाम तलवारच्या जोरावर नाही तर प्रेम आणि संदेशाच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचला.

तसेच इस्लाम फक्त 1500 वर्षांपूर्वी आला आहे या आपल्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देताना गुलाम नबी आझाद यांनी घुमजाव केले. ते म्हणाले, माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता. इस्लाम हा हजरत आदमच्या काळापासून आहे आणि अनंतकाळपर्यंत राहील, असे म्हणत गुलाम नबी आझाद यांनी स्पष्टीकरण दिले

Ghulam Nabi azad : काय म्हणाले होते गुलाम नबी आझाद

माजी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचा जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Ghulam Nabi azad) व्हिडिओमध्ये आझाद म्हणताना दिसताहेत की, इस्लामचा जन्म 1500 वर्षांपूर्वी झाला होता. भारतात कोणीही बाहेरचा व्यक्ती नाही. आम्ही सर्व या देशाचे आहोत. भारताचे मुसलमान मूळ रूपाने हिंदू होते. नंतर ते धर्मांतरीत झाले आहेत. (Ghulam Nabi azad)

हिंदू धर्म इस्लामपेक्षाही जुना आहे. सर्व मुसलमान आधी हिंदू होते. आमच्या देशात मुसलमान हे धर्मांतर केल्यानंतर झाले आहेत. काश्मीरमध्ये कश्मीरी पंडित हे धर्मांतरित झाल्यानंतर मुसलमान झाले आहेत. सर्वांचा जन्म हिंदू धर्मातच झाला होता.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news