Ishan Kishan New Record : इशान किशनच्‍या झंझावती खेळीने विक्रमांचा पाऊस!

Ishan Kishan New Record : इशान किशनच्‍या झंझावती खेळीने विक्रमांचा पाऊस!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्‍या सामन्‍यामध्‍ये सलामीवीर इशान किशनने आपल्‍या कारकीर्दीतील सर्वोत्‍कृष्‍ट फलंदाजीचे दर्शन घडवत व्‍दिशतक झळकावले. या सामन्‍यात इशान किशनने आपले शतक झळकावले. यानंतर त्‍याने १२६ चेंडूत ९ षटकार आणि २४ चौकार फटकावत आपलं व्‍दिशतक पूर्ण केले.  बांगलादेश विरूद्धची एकदिवसीय मालिका गमावली असली तरी भारताने मालिकेतील शेवटच्या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला.

इशान किशन याने आपल्‍या कारकीर्दीतील वनडेतील पहिले शतक झळकावले आणि या पहिल्या शतकाचे द्विशतकातही रूपांतर केले. बांगलादेश विरुद्धचा हा सामना इशानच्या एकदिवसीय सामन्यांच्या कारकिर्दीतील १० सामना होता. ज्यामध्ये त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठी धावसंख्या उभी केली. (Ishan Kishan New Record)  इशानच्‍या या झंझावती खेळीमुळे क्रिकेटमध्‍ये झालेल्‍या नव्‍या विक्रमांविषयी जाणून घेवूया…

१ ) इशान किशन हा आपले पहिलेच शतकी खेळीचे द्विशतकामध्ये रूपांतरीत करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

२ ) विदेशात  द्विशतक झळकावणारा इशान हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. बांगलादेशविरुद्धची त्याने केलेली २१० धावांची खेळी ही सर्वोच्च आहे. यापूर्वी चार्ल्स कोव्हेंट्री या झिम्बाव्वेच्या फलंदाजाने बांगलादेशविरूद्ध नाबाद १९४ धावांची खेळी केली होती. (Ishan Kishan New Record)

३ ) बांगलादेशमध्ये  द्विशतक शतक झळकावणार इशान पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी एप्रिल २०११ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश खेळवण्यात आलेल्या सामन्यात शेन वाटसनने नाबाद १८५ धावांची खेळी केली होती.

४)  एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकणारा इशान किशन हा जगातील तिसरा डावखुरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजचा दिग्गज डावखुरा फलंदाज ख्रिस गेल याने झिम्बाव्वे विरूद्ध १४७ चेंडूमध्ये २१५ धावा केल्या होत्या. तर पाकिस्तानचा डावखुरा फलंदाज फखर जमान याने जुलै २०१८ मध्ये झिब्माव्वे विरूद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात नाबाद २१० धावांची खेळी केली होती.

५ ) २४ वर्षीय इशान हा वनडे सामन्यात द्विशतकीय कामगिरी करणारा सर्वांत युवा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने २६ व्‍या वर्षी म्हणजेच नोव्हेंबर २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५८ चेंडूमध्ये २०९ धावा करत इतिहास रचला होता.

६) इशानने सर्वांत चांगल्या स्ट्राईक रेटने द्विशतक ठोक. त्याने १६०.३० च्या गतीने द्विशतकीय खेळी केली. यापूर्वी रोहित शर्मीने १५२.६० च्या स्ट्राईक रेटने श्रीलंकेविरूद्ध द्विशतक झळकावले होते. तर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने १४६.९७ च्या स्ट्राईक रेटने वेस्टइंडिज विरूद्ध २१९ धावांची खेळी केली होती. (Ishan Kishan New Record)

७) बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात विराट आणि इशानने तिसऱ्या विकेटसाठी २९० धावांची भागीदारी केली. या भागिदारीतील ६८.६ टक्के धावांचा वाटा ईशानने उचलला.

८)  इशान किशन याने ८५ चेंडूमध्ये वनडेतील शतक पूर्ण केले. यानंतर केवळ १८ चेंडूत त्‍याने पुढील  ५० धावांचा टप्पा पूर्ण केला.

९ ) बांगलादेशमध्ये वन-डेत सलामीवीर म्हणून ५० पेक्षा जास्त धावा करणारा इशान हा दुसरा युवा भारतीय फलंदाज ठरला. गौतम गंभीरने २१ वर्षे व १८४ दिवसांचा असताना हा पराक्रम केला होता. इशान आता २१ वर्षे व १४५ दिवसांचा आहे, त्याने वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला आहे. (Ishan Kishan New Record)

१० ) इशानने ८५ चेंडूमध्ये वनडेतील पहिले शतक झळकावले. २००३ साली युवराज सिंगने बांगलादेश विरूद्ध पदार्पणाच्या डावात शतक झळकावले होते आणि त्यानंतर अशी कामगिरी करणारा इशान हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. (Ishan Kishan New Record)

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news