मराठी ‘बिग बॉस’चा सूत्रसंचालक म्हणून दिसणार हा हँडसम मराठी अभिनेता?

मराठी ‘बिग बॉस’चा सूत्रसंचालक म्हणून दिसणार हा हँडसम मराठी अभिनेता?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी प्रेक्षकांच्या लाडक्या रिॲलिटी शोच्या यादीत बिग बॉसचं नाव सर्वात अग्रक्रमाने आहे. वेगवेगळ्या घटनांनी वादग्रस्त ठरलेल्या ठरलेल्या या शो ने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे. या शो चे आतापर्यंत तीन सीझन प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. लाडक्या सेलिब्रिटींचा बिग बॉसच्या घरातील वावर चाहत्यांना कधी सुखद तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन गेला. या शोमुळे काही सेलिब्रिटींनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तर काहींना सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागलं.

पडद्यावर सोज्वळ भूमिकेतून समोर आलेल्या कलाकारांचा खरा चेहरा या शोने समोर आणला. या शोच्या माध्यमातून अनेक कलाकार एकमेकांशी  मैत्रीच्या नात्यात बांधले गेले. तर काहींमध्ये कायमची कटुता  निर्माण झाली. यापूर्वीच्या  मदार तीन सीझननंतर आता धमाकेदार चौथा सीझन येऊ घातला आहे.

नुकतीच चौथ्या सीझनची अधिकृत घोषणा झाली. पण सीझनच्या थीमऐवजी चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे ती सूत्रसंचालकाच्या खुर्चीची. गेले तीन सीझन महेश मांजरेकर बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालक होते. तीनही सीझन महेश यांनी खुमासेदार आणि गरज पडेल तेव्हा  तिखट शैलीत उत्तम सादर केला. पण आता त्यांची जागा दूसरा अभिनेता घेण्याची चर्चा जोर धरते आहे. मागच्या सीझनला महेश यांच्यावर कॅन्सरवरील उपचार सुरू होते. त्यावेळी नेटाने शूटिंगला येत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं होतं. पण त्याचा बिग बॉससोबतचा करार संपल्याने त्यांची जागा हँडसम अभिनेता अंकुश चौधरी घेणार असल्याचं एका बिग बॉस फॅन पेजने शेअर केलं आहे. अर्थातच फॅन्सनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. आता या चर्चा कितीही सुरू असल्या तरी सूत्रसंचालक कोण बनणार हे मात्र प्रोमोमध्येच दिसून येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news