स्वप्नांवरून भविष्यातील आजारांचे भाकीत करणे शक्य?

स्वप्नांवरून भविष्यातील आजारांचे भाकीत करणे शक्य?

वॉशिंग्टन : स्वप्नांचा विचार आपल्याकडे प्राचीन काळापासूनच केला जात आहे. तीन प्रकारच्या अवस्थांमध्ये जागृती आणि सुषुप्तीबरोबर स्वप्न अवस्थेचा विचार मांडुक्य उपनिषदात झालेला आहे. स्वप्नांचे अर्थही अनेक लोक लावत असतात, त्यावरून भविष्याचा वेध घेण्याचाही प्रयत्न केला जात असतो. मात्र विज्ञानातही स्वप्नांचा अशा स्वरुपाने वापर होऊ शकेल असे आपल्याला कधी वाटले नसेल. आता अमेरिकेतील संशोधकांनी त्याद़ृष्टीने प्रयत्न केले आहेत. स्वप्नांचा आधार घेऊन भविष्यात उद्भवणार्‍या आजारांचा वेध घेतला जाऊ शकेल, असे त्यांना वाटते.

माणसाच्या आयुष्यात स्वप्नाला खूप महत्त्व आहे. स्वप्न प्रतिमा, विचार, भावना आणि संवेदनांचा असा क्रम आहे, जो सर्वसाधारणपणे झोपेच्या काही टप्प्यांदरम्यान मनात अनपेक्षित रूपात येतो. हा झोपेत माणसाचा असा अनुभव आहे, जे वास्तव वाटते व जागे झाल्यावरही काही स्वप्ने लक्षात राहतात. तर काही विसरून जातात. स्वप्नाबाबत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात आणि स्वप्न शास्त्रात प्रत्येक स्वप्नाबाबत काही अर्थही सांगितला जातो. अमेरिकेत शास्त्रज्ञांनी स्वप्नाबाबत केलेल्या संशोधनात दावा केला की, स्वप्नाच्या पॅटर्ननुसार व्यक्तीच्या भविष्यात लकवा, पार्किन्सन्ससह मेंदूच्या अन्य आजारांची माहिती प्राप्त केली जाऊ शकते.

जर्मनीत युनिव्हर्सिटी हॉस्पिटल श्लेस्विग-होल्स्टीनच्या न्यूरॉलॉजिस्ट डॅनिएल बर्ग म्हणाल्या, पार्किन्सन्सच्या सुरुवातीच्या कारणांत 'आरबीडी' विशेष आहे. हे आपल्याकडे सर्वात बळकट क्लिनिकल प्रोड्रोमल मार्कर आहे. शास्त्रज्ञांनुसार, स्वप्न एक प्रकारे आजाराचे प्रतीक आहे. हे झोपेत डोळ्यांच्या बाहुल्या वेगाने इकडे-तिकडे फिरतात तेव्हा घडते. याला रॅपिड आय मुव्हमेंट (आरईएम) म्हणतात. झोपेच्या वेळी आरईएमला शास्त्रज्ञ विशेष आजार 'आरबीडी' म्हणतात. हे 1.5 टक्के लोकांवर परिणाम करते. आरबीडी न्यूरोडीजेनेरिटव्ह आजाराचा संकेत देऊ शकतो.

सुरुवातीस हे सिन्युक्लिनोपॅथिक आहे. ही एक अशी स्थिती ज्यात खास प्रोटीन सिन्युक्लिन किंवा अल्फा-सिन्युक्लिन ब्रेनमध्ये विषारी गुच्छाची निर्मिती करते. मेयो क्लिनिकमध्ये केलेल्या अभ्यासातून उघड झाले की, स्वप्न रुग्णाच्या जीवनकाळात न्यूरोडिजेनेरेटिव्ह रोग विकसित होण्याच्या 80 टक्क्यांपेक्षा शक्यतांची भविष्यवाणी करते. मिनोसोटाचे मानसोपचार तज्ज्ञ कार्लोस शेंक यांनी आरबीडीच्या पहिल्या रुग्णाची नोंद 1980 मध्ये केली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news