Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर तिसऱ्या दिवशीही शोधकार्य सुरू; मृतांचा आकडा २४ वर

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर तिसऱ्या दिवशीही शोधकार्य सुरू; मृतांचा आकडा २४ वर

पुढारी ऑनलाईन डेस्क : खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीत (Irshalwadi Landslide) आज (दि.२२) तिसऱ्या दिवशीही शोधकार्य सुरू आहे. आज आणखी दोन मृतदेह सापडले आहेत, त्यामुळे आतापर्यंत मृतांची संख्या २४ झाली असून अद्यापही ८६ लोक अडकले असल्याची माहिती मिळत आहे. विविध पथकांच्या माध्यमातून सकाळी सहापासूनच शोधकार्य सुरू करण्यात आले; पण धो-धो कोसळणारा पाऊस आणि गडद धुक्यामुळे प्रचंड अडथळे निर्माण होत आहेत. दरम्यान शुक्रवारी सहा मृतदेह सापडले होते. यामध्ये 3 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश होता.

रायगड जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, इर्शाळवाडीची लोकसंख्या 228 आहे. आपत्तीनंतर यापैकी 98 ग्रामस्थांना वाचवले आहे. ते सर्व सुरक्षित आहेत. पाच जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सद्यस्थितीत 103 ग्रामस्थ बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. ढिगार्‍याखाली मृतांची संख्या मोठी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, आता परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

इर्शाळवाडीत बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास महाकाय दरड कोसळून अनेक घरे गाडली गेली आहेत. गुरुवारी १६ मृतदेह ढिगार्‍याखालून बाहेर काढण्यात आले होते. 'एनडीआरएफ', 'एसडीआरएफ' आणि स्वयंसेवी संस्थांची पथके असे ५०० हून अधिक कार्यकर्ते मदतकार्यात आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news