irrfan khan : इरफान खानचा शेवटचा चित्रपट ‘The Song of Scorpions’ रिलीज होण्यास सज्ज

irrfan khan
irrfan khan

पुढारी ऑनलाईन डेस्क :  इरफान खानचा शेवटचा चित्रपट The Song Of Scorpions रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. इरफान खान या दुनियेत नाही. (irrfan khan) पण आजदेखील ते आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून लोकांच्या मनात जीवंत आहे. त्यांचा शेवटचा चित्रपट द सॉन्ग ऑफ द स्कॉर्पियंस २८ एप्रिल, २०२३ रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट जीशान अहमदने प्रोड्यूस केला आहे. या चित्रपटामध्ये गोल शिफते फरहानी, वहीदा रहमान आणि शशांक अरोरादेखील आहेत. चित्रपट निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर फॅन्ससोबत शेअर करत लिहिलं की- "प्रेम, धोका आणि एक गाणे (#TheSongOfScorpions) (irrfan khan)

अनुराग कश्यपनेदेखील केलं ट्विट

चित्रपट निर्माते अनुराग कश्यपनेदेखील चित्रपटाचे पोस्टर ट्विट करत लिहिलं की, "अनुप सिंह यांची "बिच्छुओं का गीत "आखिरकार २८ एप्रिल रोजी भारतात रिलीज होत आहे. चित्रपटामध्ये इरफान यांचा उत्तम अभिनय आहे आणि चित्रपटामध्ये में सुंदर गोलशिफतेह फरहानी आणि वहीदा देखील आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news