तुमच्‍या शरीरात लोहकमतरता आहे? जाणून घ्‍या लक्षणे

तुमच्‍या शरीरात लोहकमतरता आहे? जाणून घ्‍या लक्षणे

शरीर आरोग्यपूर्ण तंदुरुस्त राखण्यासाठी सर्वच पोषक घटकांची आवश्यकता असते. एखाद्या पोषक घटकाची कमतरता निर्माण होते तेव्हा आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. सतत थकल्यासारखे वाटणे, श्वास घेण्यात अडथळा निर्माण होणे अशी लक्षणे दिसल्यास शरीरात लोहाची कमतरता आहे असे समजावे. ( Iron deficiency anemia Symptoms )

लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येतो किंवा अ‍ॅनिमिया होतो. शरीरात लाल रक्तपेशींचे योग्य रीतीने निर्मिती होत नाही परिणामी शरीरातील रक्तकमी होते. शरीरात लोहाची कमतरता असल्याची काही लक्षणे शरीर दर्शवते. कोणती आहेत ही लक्षणे पाहुया.

 Iron deficiency anemia Symptoms : एकाग्रता

लोहाच्या कमतरेचा परिणाम अर्थातच मेंदूच्या क्षमतेवरही होत असतो, त्यामुळे व्यक्तीची एकाग्रता कमी होते.

श्वसनास त्रास

जिना चढला किंवा जास्त काम केल्यास दम लागणे, श्वसनास त्रास होतो; पण बसल्या जागीही जर श्वास घ्यायला त्रास होत असेल तर शरीरात लोहाची कमतरता आहे असे सांगणारे हे लक्षण आहे.

स्नायूंमध्ये वेदना

शरीरात लोहाची कमतरता असेल तर स्नायूंमध्ये वेदना होतात, अशा परिस्थितीत जर शरीराला इजा झाली, तर ही जखम बरी होण्यास बराच कालावधी लागतो.

 Iron deficiency anemia Symptoms : थकवा

लोहाची कमतरता असल्याने हिमोग्लोबिनही कमी होते. रक्तातील हिमोग्लोबिन हे शरीराच्या सर्वच भागाला ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते. हिमोग्लोबिनची कमतरा असेल तर शरीर योग्य प्रकारे काम करू शकत नाही आणि सतत थकवा आल्यासारखे वाटते. शरीराला लोहाची कमतरता भासत असल्याचे मोठे लक्षण म्हणजे थकवा आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news