Iran Israel War : इस्रायल-इराण तणाव, भारत-इस्रायल विमानसेवा स्थगित हाेणार?

Iran Israel War
Iran Israel War
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारत आणि इस्रायलमधील विमानसेवा स्थगित होऊ शकते. इस्रायल आणि इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमान वाहतूक कंपन्या लवकरच मोठा निर्णय घेऊ शकतात, यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचे वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. (Iran Israel War)

सीरियातील इराणच्या दूतावासावर झालेल्या हल्ल्यानंतर इराणने प्रत्युत्तर देत इस्त्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला, त्यानंतर दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. या तणावाच्या पाश्वभूमीवर भारत आणि इस्रायलमधील विमानसेवेवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे. दरम्यान या दोन्ही देशातील विमानसेवा रद्द होऊ शकते, असे देखील वृत्तात म्हटले आहे. (Iran Israel War)

Iran Israel War: आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून – एअर इंडिया

भारतातील सर्वात मोठी एअरलाइन एअर इंडियाने म्हटले आहे की, आम्ही मध्य पूर्वेतील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. एअर इंडिया युरोप, अमेरिका आणि मध्य पूर्वमध्ये उड्डाणे चालवते. प्रवासी आणि हवाई दलाच्या सुरक्षेचा विचार करून उड्डाणासाठी पर्यायी मार्गांचा विचार केला जाऊ शकतो, असे देखील एअर इंडियाचे म्हटले आहे.

हवाई वाहतूक कंपनी Vistara काय म्हणाली?

दुसरीकडे, हवाई वाहतूक कंपनी Vistara ने इराणच्या हवाई क्षेत्रात उड्डाण न करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने युरोप, अमेरिका आणि मध्य पूर्वेतील फ्लाइटचे मार्ग बदलले आहेत. Vistara एअरलाइन्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्याची परिस्थिती पाहता काही विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. विमान कंपनीने खबरदारी म्हणून लांबच्या पल्ल्याचा मार्ग वापरण्याच निर्णय घेतला आहे, ज्यामुळे प्रवासाचा वेळ वाढू शकतो, असेही म्हटले आहे. Vistara कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे आणि आवश्यक असल्यास नवीन बदल केले जातील.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news