पुढारी ऑनलाईन डेस्क : . इस्त्रायलमधील नागरिकांच्या रक्षणासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. अमेरिका इराणशी संघर्ष करू इच्छित नाही; परंतु आपल्या सैन्याच्या संरक्षणासाठी आणि इस्रायलच्या संरक्षणास समर्थन देण्यासाठी कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशा शब्दांमध्ये इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यावर अमेरिकेने प्रतिक्रिया दिली आहे. ( Iran-Israel Tension )
इस्रायल-हमास युद्धादरम्यान इराणने शनिवारी रात्री उशिरा इस्रायलच्या भूभागावर हल्ला केला. इराणने इस्रायलवर 300 हून अधिक डागलेली क्षेपणास्त्रे आम्ही रोखली आहेत, असा इस्रायलने दावा केला आहे. ( Iran-Israel Tension )
याबाबत बोलताना अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी स्पष्ट केले आहे की, अमेरिका इराणशी संघर्ष करू इच्छित नाही परंतु आपल्या सैन्याच्या संरक्षणासाठी आणि इस्रायलच्या संरक्षणास समर्थन देण्यासाठी कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही. इस्त्रायली लोकांच्या रक्षणासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
अमेरिका, ब्रिटन, फ्रान्ससह अनेक पाश्चिमात्य देशांनी इराणच्या हल्ल्यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. मात्र, अमेरिकेने सध्या इराणसोबत कोणताही संघर्ष नको असल्याचे म्हटले आहे. हल्ल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी युद्ध मंत्रिमंडळाची बैठक बोलावली.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी बोलवली तातडीची बैठक
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही इराणच्या हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पुढील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी त्यांनी आज तातडीने G-7 नेत्यांची बैठक बोलावली आहे. दरम्यान, बायडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली. ते म्हणाले, "आजच्या सुरुवातीला, इराण आणि येमेन, सीरिया आणि इराकमधील त्यांच्या सहानुभूतीदारांनी इस्रायलमधील लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करून अनपेक्षित हल्ला केला. मी या हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो.
हेही वाचा :