पुढारी ऑनलाईन डेस्क : सलामीवीर फिल सॉल्टच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने लखनौ सुपरजायंट्सचा आठ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना लखनौने 20 षटकांत सात गडी गमावून 161 धावा केल्या, परंतु सॉल्टच्या 14 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 89 धावांच्या जोरावर केकेआरने 15.4 षटकांत दोन गडी गमावत १६२ धावांचे लक्ष्य पूर्ण केले.केकेआरसाठी कर्णधार श्रेयस अय्यरने 38 चेंडूत नाबाद 38 धावा केल्या, तर लखनऊसाठी वेगवान गोलंदाज मोहसीन खानने दोन्ही विकेट घेतल्या.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत आज 28 व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) लखनऊ सुपरजायंट्सचा सामना पार पडला. कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) लखनौ सुपरजायंट्सला 20 षटकात सात विकेट्सवर 161 धावांवर रोखले.
लखनौने दिलेल्या १६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताने सलामीवीर सुनील नरेनची विकेट गमावली आहे. नरेन सहा चेंडूत सहा धावा करून बाद झाला. नरेनला मोहसीन खानने बाद केले. तत्पूर्वी, केकेआरने चांगली सुरुवात केली आणि पहिले षटक टाकण्यासाठी आलेल्या शामर जोसेफच्या षटकातून 22 धावा केल्या. वेगवान गोलंदाज मोहसीन खानने अंगक्रिश रघुवंशीला बाद करून केकेआरला दुसरा धक्का दिला. रघुवंशी सहा चेंडूत सात धावा करून बाद झाला.पॉवरप्ले दरम्यान लखनौ सुपरजायंट्सच्या गोलंदाजांनी केकेआरला दोन धक्के दिले, पण सलामीवीर फिल सॉल्टने शानदार खेळी करत केकेआरची धुरा सांभाळली. पॉवरप्ले संपल्यानंतर कोलकाताने 2 बाद 58 धावा केल्या.
वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) लखनौ सुपरजायंट्सला 20 षटकात सात विकेट्सवर 161 धावांवर रोखले. लखनौकडून निकोलस पुरनने 32 चेंडूत दोन चौकार आणि चार चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 45 धावा केल्या. केकेआरसमोर विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य आहे.
लखनऊ सुपरजायंट्सचा सलामीवीर क्विंटन डी कॉक बाद झाला. कोलकाताचा गोलंदाज वैभव अरोरा याने डी कॉकला बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले. डी कॉक आठ चेंडूत १० धावा करून बाद झाला. यानंतर दीपक हुडा मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. हुडा १० चेंडूत आठ धावा करून बाद झाला.अष्टपैलू आंद्रे रसेलने लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुलला बाद करून कोलकाताला तिसरे यश मिळवून दिले. राहुल २७ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३९ धावा केल्या.
केकेआरचा गोलंदाज वरुण चक्रवर्तीने मार्कस स्टॉइनिसला बाद करून लखनौ सुपरजायंट्सला चौथा धक्का दिला. पाच चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने 10 धावा करून स्टॉइनिस बाद झाला. फिल सॉल्टने विकेटच्या मागे अप्रतिम झेल घेत स्टॉइनिसला मोठी खेळी करण्यापासून रोखले. यानंतर १५ व्या षटकामध्ये नरेनला आयुष बडोनीने अंग्रकिश रघुवंशी करवी झेलबाद केले. त्याने २७ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार फटकावत २९ धावा केल्या. लखनौला १११ धावांवर पाचवा धक्का बसला.
कोलकाता नाइट रायडर्स : फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती. इम्पॅक्ट सब: सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग.
लखनौ सुपरजायंट्स: क्विंटन डी कॉक, केएल राहुल (यष्टीरक्षक, कर्णधार), दीपक हुडा, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, शामर जोसेफ, यश ठाकूर. इम्पॅक्ट सब: अर्शद खान, प्रेरक मांकड, एम सिद्धार्थ, अमित मिश्रा, के. गौतम.