पुढारी ऑनलाईन : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) २०२४ च्या हंगामासाठी आज दुबईत लिलाव होत आहे. पुढील आवृत्ती भारतात खेळली जाणारी जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग मार्च २०२४ मध्ये सुरू होईल. त्यापूर्वी आज 'आयपीएल'चा लिलाव सुरु झाली. या लिलावाच्या सुरुवातीला कॅप्ड खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिजच्या T20I क्रिकेट संघाचा कर्णधार रोव्हमन पॉवेल याच्यावर पहिली बोली लावण्यात आली. त्याला राजस्थान रॉयल्यने ७ कोटी ४० लाखांना खरेदी केले. पॉवेलची बेस प्राइस १ कोटी होती. (IPL Auction 2024)
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेड याला सनरायजर्स हैदराबादने ६.८ कोटी रुपये मोजून आपल्याकडे घेतले. त्याची बेस प्राइस २ कोटी होती. २ कोटी बेस प्राइस असणाऱ्या इंग्लंडच्या हॅरी ब्रूक याच्यासाठी दिल्ली आणि राजस्थानमध्ये जोरदार रस्सीखेच दिसून आली. पण अखेर दिल्ली कॅपिटल्सने त्याला ४ कोटींना खरेदी केले. ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ अनसोल्ड राहिला. त्याची बेस प्राइस २ कोटी होती.
श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदु हसरंगा याला सनरायजर्स हैदराबादने १.५ कोटींना खरेदी केले. न्यूझीलंडला अष्टपैलू खेळाडू रचिन रविंद्र याला चैन्नई सुपर किंग्जने १ कोटी ८० लाख रुपयांना घेतले. रचितची बेस प्राइस ५० लाख होती. भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर याला चैन्नईने ४ कोटींना खरेदी केले.
भारतीय खेळाडू करुण नायर याच्यावर कोणीच बोली लावली नाही. त्याची बेस प्राईस ५० लाख होती. तसेच मनीष पांडे यालाही कोणीही खरेदीदार मिळाला नाही.
विशेष म्हणजे यावेळी मल्लिका सागर लिलावकर्ता म्हणून काम पाहात आहे. ती आयपीएलच्या इतिहासातील पहिली महिला लिलावकर्ता ठरली आहे.
'आयपीएल'चा लिलाव पहिल्यांदाच भारताबाहेर होत असून, यावेळी तो दुबईत होत आहे. यात एकूण ३३३ खेळाडूंचा लिलाव होईल आणि विविध फ्रँचायझी अपेक्षित खेळाडूंना करारबद्ध करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावत असतील, तर यात आश्चर्याचे कारण असणार आहे.
सहभागी संघांना ७७ स्लॉट आहेत, त्यापैकी ३० स्लॉट विदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत. २३ खेळाडूंनी २ कोटी रुपयांच्या ब्रॅकेटमध्ये स्वतःची नोंदणी केली आहे, तर १३ खेळाडूंनी १.५ कोटी रुपयांच्या स्लॉटमध्ये राहणे पसंत केले आहे. ३३३ खेळाडूंपैकी २१४ भारतीय आणि ११९ विदेशी खेळाडू आहेत, ज्यात दोन सहयोगी देशांचा समावेश आहे. कॅप्ड खेळाडूंची एकूण संख्या ११६ आहे, तर अनकॅप्ड खेळाडूंची संख्या २१५ आहे. (IPL Auction 2024)
२०२४ च्या 'आयपीएल' लिलावासाठी ३३३ क्रिकेटपटूंची निवड केली आहे. यापैकी २३ खेळाडू आहेत ज्यांनी त्यांची मूळ किंमत २ कोटी रुपये ठेवली आहे. सध्या 'आयपीएल'च्या आगामी हंगामासाठी ७७ खेळाडूंची जागा रिक्त आहे, याचा अर्थ लिलावात जास्तीत जास्त खेळाडू विकले जाऊ शकतात. त्यापैकी ३० परदेशी खेळाडूंसाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे.
हे ही वाचा :