पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत बुधवारी(१० एप्रिल ) झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनला सलग दोन धक्के बसले. गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव झाला. त्याचबरोबर स्लो ओव्हर रेटसाठी त्याला १२ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
बुधवारच्या सामन्यात अखेरच्या चेंडूवर गुजरात टायटन्स संघाने बाजी मारली. या पराभवाने राजस्थान रॉयल्सचे चाहते निराश झाले. यापाठोपाठ संजू सॅमसनलही दंड ठोठवण्यात आल्याने त्यांना दुहेरी धक्का बसला आहे.
याबाबत आयपीएलच्या दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की,. "राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याला बधुवारी सवाई मानसिंग स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध झालेल्या सामन्यातील स्लो ओव्हर रेट ठेवल्यामुळे दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या किमान ओव्हर रेटच्या गुन्ह्यांशी संबंधित आचारसंहितेअंतर्गत हा त्याच्या संघाचा हंगामातील पहिला गुन्हा असल्याने त्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचेही या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
बुधवारी झालेल्या सामन्यात कर्णधार संजू सॅमसन याने ३८ चेंडूत ६८ धावांची प्रभावी नाबाद खेळी केली. रियान पराग याने ७८ धावांची दमदार खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने १९६ धावांपर्यंत मजल मारली. गुजरात टायटन्सने कर्णधार गिलच्या ७२ धावा आणि अफगाणिस्तानच्या फिरकीपटू रशीद खान (११ चेंडूंत २४) खेळीने या सामन्याच्या अंतिम चेंडूवर गुजरात लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्यात यशस्वी ठरले.
हेही वाचा ;