पुढारी ऑनलाईन डेस्क : Ruturaj Gaikwad IPL 2024 : आयपीएलच्या 29 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने मुंबई इंडियन्स (MI) चा 20 धावांनी पराभव केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रविवारी (14 एप्रिल) झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजयासाठी 207 धावांचे लक्ष्य मिळाले होते, मात्र त्यांना सहा गडी गमावून 186 धावाच करता आल्या.
चेन्नई सुपर किंग्जच्या या दणदणीत विजयात कर्णधार ऋतुराज गायकवाडने महत्त्वाची भूमिका बजावली. गायकवाडने 40 चेंडूत 69 धावा केल्या, ज्यात पाच षटकार आणि तब्बल चौकारांचा समावेश होता. या सामन्यात गायकवाड तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. ऋतुराजच्या जागी रचिन रवींद्रसोबत अजिंक्य रहाणेने सलामी दिली.
या शानदार खेळीदरम्यान ऋतुराजने एक मोठा विक्रम नोंदवला. ऋतुराज आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद 2000 धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने केएल राहुलचा मागे टाकले. ऋतुराजने आपल्या 57व्या डावात दोन हजार धावा पूर्ण केल्या आहेत, तर राहुलला अशी हा टप्पा गाठण्यासाठी 60 डाव खेळावे लागले होते. एकूण यादीत ऋतुराज तिसऱ्या स्थानावर आहे. आयपीएलमध्ये सर्वात जलद दोन हजार धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे, ज्याने 48 डावांमध्ये हा विक्रम केला होता. (Ruturaj Gaikwad IPL 2024)
ख्रिस गेल : 48 डाव :
शॉन मार्श : 52 डाव
ऋतुराज गायकवाड : 57 डाव
केएल राहुल : 60 डाव
सचिन तेंडुलकर : 63 डाव
ऋतुराज गायकवाड : 57 डाव
केएल राहुल : 60 डाव
सचिन तेंडुलकर : 63 डाव
ऋषभ पंत : 64 डाव
गौतम गंभीर : 68 डाव
ऋतुराज गायकवाडने आतापर्यंत आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व केले आहे. सीएसकेसाठी 2000 धावा पूर्ण करणारा तो सहावा फलंदाज आहे. त्याच्या आधी अशी कामगिरी सुरेश रैना (5529), एमएस धोनी (4996), फाफ डू प्लेसिस (2932), मायकेल हसी (2213) आणि मुरली विजय (2205) यांनी केली आहे. गायकवाडने आतापर्यंत 57 आयपीएल डावांमध्ये 39.62 च्या सरासरीने 2021 धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे.