IPL 2023 Statistics : 1124 षटकार… 24,428 धावा… आयपीएलमधील आकडे पाहून थक्क व्हाल

IPL 2023 Statistics : 1124 षटकार… 24,428 धावा… आयपीएलमधील आकडे पाहून थक्क व्हाल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2023 Statistics : जगातील सर्वात प्रसिद्ध टी-20 लीग आयपीएलच्या 16 व्या हंगामाची जल्लोषात सांगता झाली. सीएसके संघ आयपीएलचा पुन्हा चॅम्पियन बनला आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. प्रत्येक क्षणी बदलणाऱ्या आयपीएलच्या अंतिम सामन्याने संपूर्ण लीगला इतके यश का मिळाले हे स्पष्ट केले. मात्र, काही गोष्टींवर नजर टाकली तर ही लीग किती वेगाने बदलत आहे, हे कळते.

आयपीएलमधील लक्षवेधी आकडेवारी (IPL 2023 Statistics)

  • स्पर्धेतील षटकारांची संख्या यंदा 1100 च्या पुढे गेली. यात फाफ डुप्लेसी (36) आणि शिवम दुबे (35) हे षटकार खेचण्यात आघाडीवर राहिले. एकूण आयपीएल हंगामात 1124 षटकार मारले गेले. गेल्या वेळी हीच संख्या 1062 होती.
  • आयपीएलच्या 16 हंगामात खेळाडूंच्या वैयक्तिक शतकांनी दहाचा आकडा पार केला. 2022 मध्ये 8 शतके झळकावली, तर यावेळी फलंदाजांनी 12 शतके फटकावली. शुबमन गिलच्या बॅटमधून 3 शतके झळकली. हा मोसम केवळ शतकांच्याच नव्हे तर चौकारांच्या बाबतीतही पुढे राहिला. यावेळी 2172 चौकार मारले गेले. गेल्या दोन सीझनमध्येही दोन हजाराहून अधिक वेळा चेंडू सीमापार पाठवण्यात फलंदाज यशस्वी झाले होते.
  • आयपीएल 2023 इम्पॅक्ट, कन्कशन, वाईड आणि नोबॉलसाठी रिव्ह्यूव या आणि इतर काही नवीन नियमांसह खेळला गेला. यात मुंबई इंडियन्सचा इशान किशन हा पहिला खेळाडू होता जो कन्कशन या नियमामुळे गुजरात टायटन्सविरुद्धच्या क्वालीफायर 2 च्या सामन्यात पुढे खेळू शकला नाही. मात्र, त्याचे न खेळणे मुंबईसाठी खूपच निराशाजनक ठरले आणि त्याच सामन्यात संघ स्पर्धेतून बाहेर पडला.
  • या हंगामात 106 खेळाडू खाते न उघडताच बाद झाले. 2022 मध्ये 107 खेळाडू शून्यावर बाद झाले होते.
  • आयपीएलच्या या मोसमात एकूण 24,428 धावा झाल्या. गेल्या वर्षी हाच आकडा 23,052 होता.
  • यावेळी राखीव दिवशी पहिल्यांदाच अंतिम सामना खेळवण्यात आला.
  • डकवर्थ लुईसमुळे 200 हून अधिक धावा करूनही अंतिम फेरीत हरणारा गुजरात टायटन्स हा पहिला संघ ठरला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news