IPL 2022 : आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे टॉप-3 गोलंदाज कोण आहेत?

IPL History : 7 दिग्गज खेळाडू ज्यांना IPL मध्ये फक्त एक सामना खेळण्याची मिळाली संधी!
IPL History : 7 दिग्गज खेळाडू ज्यांना IPL मध्ये फक्त एक सामना खेळण्याची मिळाली संधी!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलमध्ये (IPL) जगभरातील अनेक दिग्गज गोलंदाज सहभागी झाले आहेत. त्यामुळे आयपीएलचा स्तर खूप उंचावला आहे. यंदाही आयपीएलमध्ये गोलंदाजांचे नवे रूप पाहायला मिळणार असून, त्या जोरावर ते फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवताना अणखीनच मनोरंजक असेल. पण त्याआधी आपण आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेणार्‍या गोलंदाजांबद्दल चर्चा करूया. (IPL 2022)

1. अमित मिश्रा (Amit Mishra)

भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्रा आयपीएलमधील पहिल्या तीन गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. अमित मिश्राने आयपीएलच्या 154 सामन्यात 166 विकेट घेतल्या आहेत. त्याने चार वेळा 4 विकेट आणि एकदा 5 विकेट घेण्याचा पराक्रमही केला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की मीश्राने डेक्कन चार्जर्स, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना आयपीएलमध्ये चमकदार कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. पण यावर्षी IPL लिलावादरम्यान अमित मिश्रा विकत घेण्यात कोणत्याच फ्रॅचायझीने स्वारस्य दाखवले नाही. (IPL 2022)

2. ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo)

या यादीत वेस्ट इंडिजचा माजी स्टार गोलंदाज ड्वेन ब्राव्हो दुसऱ्या स्थानावर आहे. ड्वेन ब्राव्होने आयपीएलमध्ये आतापर्यंत 151 सामन्यात 167 विकेट मिळवल्या आहेत. 2016 मध्ये गुजरात लायन्सकडून खेळताना त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध 22 धावांत चार विकेट पटकावल्या होत्या. ही त्याची आयपीएल करियरमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. ब्राव्हो हा आयपीएलच्या 15 व्या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK)चा एक भाग आहे. त्यामुळे तो यादीत अव्वलस्थान पटकावेल अशी शक्यता आहे. (IPL 2022)

3. लसिथ मलिंगा (Lasith Malinga)

श्रीलंकेचा आणि मुंबई इंडियन्सचा माजी स्टार गोलंदाज लसिथ मलिंगा यानेही आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे, मात्र हा दिग्गज गोलंदाज आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत आजही पहिल्या क्रमांकावर आहे. मलिंगाच्या नावावर 122 सामन्यात 170 बळी आहेत, यावरून त्याची क्षमता दिसून येते. मलिंगाने 2019 मध्ये शेवटचा आयपीएल सामना खेळला, परंतु असे असूनही तो या यादीत अव्वल स्थानावर आहे. (IPL 2022)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news