Investors: नव्या गुंतवणूकदारांना चांगली संधी

Investors: नव्या गुंतवणूकदारांना चांगली संधी
Published on
Updated on

चालू आर्थिक वर्षातील आतापर्यंचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन (Net Direct Incometax Collection) 17 टक्क्यांनी वाढून ते 13.73 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. ते संपूर्ण आर्थिक वर्षासाठीच्या सुधारित उद्दिष्टाच्या 83.19 टक्के जास्त असल्याचे केंद्रिय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) सांगितले. यंदाचे निव्वळ प्रत्यक्ष करसंकलन मागील वर्षाच्या याच कालावधीतील संकलनापेक्षा 16.78 टक्के जास्त व एकूण अर्थसंकल्पाच्या 96.67 टक्के आहे. तर ढोबळ प्रत्यक्ष कर संकलन 22.58 टक्क्यांनी वाढून 16.68 लाख कोटी रुपये झाले आहे. वैयक्तिक प्राप्तिकर आणि कार्पोरेट कराचा समावेश असलेल्या या प्रत्यक्ष करसंकलनातील ही वाढ वैयक्तिक प्राप्तिकर संकलनातील वाढीमुळे झाली असल्याचे केंद्रिय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) म्हटले आहे.

एक एप्रिल 2022 ते 10 मार्च 2023 या कालावधीत 2.95 लाख कोटी रुपयांचा परतावा (Tax Refund) जारी करण्यात आला आहे. जो मागील वर्षातील याच कालावधीत देण्यात आलेल्या परताव्याच्या तुलनेत 59.44 टक्क्यांनी जास्त आहे.

सध्या जागतिक बँकांची दिवाळखोरी काळजी करण्यासारखी झाली आहे. बेसिक 3 नियमांचे काटेकोपणे पालन न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या अर्थविश्वातून येणार्‍या बातम्या या धक्कादायक आहेत. जागतिक मंदीच्या छायेतून जागतिक बाजार जातील, असेही सांगितले जात होते. ते बाजूलाच राहिले आणि दुसरेच नवे अनपेक्षित संकट व समस्या ब्रह्मराक्षसाप्रमाणे अमेरिकेसमोर उभ्या राहिल्या. सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत निघाली. एसव्हीबी बँक व आता यूएसडीसी बँक वाढते व्याजदर व महागाई यामुळे दिवाळखोरीत आल्या. मात्र त्यासाठी लढायला अमेरिकेची मध्यवर्ती फेडरल बँक दुबळी ठरली. याचे दूरगामी परिणाम अमेरिकेतील नागरिकांना भोगायला लागत आहेत.

याउलट भारतीय रिझर्व्ह बँकेने खंबीर धोरण आखल्यामुळे आपली परिस्थिती उत्तम आहे. सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) आपल्याकडे म्हणावे तितके समर्थ नाही, पण दुबळेही नक्कीच नाही. आपल्याकडील राष्ट्रीय शेअर बाजार व निफ्टी या पार्श्वभूमीवर स्थिर आहेत. म्हणजे ते अनुक्रमे 59135 व 17412 च्या आसपास आहेत. जे नवे गुंतवणूकदार आहेत, त्यांना चांगली संधी उपलब्ध आहे. टाटा समूहातील टाटा स्टील, टाटा कन्सल्टन्सी, टाटा केमिकल्स, टाटा मोटर्स, याचबरोबर इन्फोसिस, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक यांचाही समावेश गुंतवणुकीत असावा. मात्र कुठलीही गुंतवणूक करताना इतरांची मते व स्वत:चा अभ्यास यावर निश्चितच भर हवा.

गृहकर्जावरील व्याजदर बँका हळूहळू कमी करत आहेत. निवार्‍यासाठी दिलेली कर्जेे सहसा बुडत नाहीत. हे त्याचे प्रमुख कारण आहे. गृहकर्जाचा सध्याचा महाराष्ट्र बँकेचा व्याजदर 8.4 टक्के आहे. इतर बँकांच्या तुलनेत बँक ऑफ महाराष्ट्रचा दर सर्वात कमी आहे.

भारताची अर्थव्यवस्था 'पाच ट्रिलीयन डॉलर्स' करण्यासाठीची पावले केंद्र सरकार समर्थपणे टाकत आहे. हे उद्दिष्ट सन 2027 अखेरपर्यंत पुरे होईल, असे सध्या तरी वाटते. देशाच्या औद्योगिक उत्पादनात जानेवारी 2023 अखेर वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 5.2 टक्के झाली आहे. डिसेंबर 2022 ही वाढ 4.7 टक्के होती. ऊर्जा, खाणकाम या उत्पादन क्षेत्राची चांगली कामगिरी झाल्यामुळे एकूण औद्योगिक उत्पादन वाढले आहे. त्यामुळे भारतात वीज नसलेल्या खेड्यांची संख्या अत्यल्प आहे. जानेवारी 2023 मध्ये ऊर्जा क्षेत्राने घसघशीत 12.7 टक्क्यांनी वृद्धी गाठली.

रुपयामध्ये व्यापार करण्यासाठी रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे वेग मिळाला. मात्र त्यामुळे भारताचाच जास्त फायदा होतो कारण त्यामुळे आपली निर्यात वाढते. हा व्यापार करण्यासाठी आता 18 देश तयार झाले आहेत. भारतीय बँकांतून त्यासाठी खातीपण उघडली गेली आहेत. अप्रत्यक्षरीत्या बँकांतील विदेश विनिमय व्यवहार वाढले आहेत व रुपया सशक्त होत आहे. एचडीएफसी बँक, युको बँक यासह अनेक बँकांनी यासाठी सुविधा देऊ केल्या आहेत. एकूण 30 बँकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

डॉ. वसंत पटवर्धन

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news