‘त्या’ वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या मालमत्तेची चौकशी करा; अजित पवारांची मागणी

‘त्या’ वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या मालमत्तेची चौकशी करा; अजित पवारांची मागणी

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या बदलीवरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीत मिठाचा खडा पडला आहे. भाजपने ताकदीचा उमेदवार दिल्यास खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दाखवून भाजपलाच आव्हान दिले होते. यातून युतीमध्ये तणाव निर्माण झाला असताना आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) कडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे पत्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याचे पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केल्याने ठाणे जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

डोंबिवलीचे भाजपचे अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर मानपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा शिंदे गटाच्या दबावातून दाखल करून घेण्यात आल्याचा आरोप भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यानंतर भाजपच्या बैठकीमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक बागडे यांची बदली होत नाही, तोपर्यंत खासदार शिंदे यांचा प्रचार करायचा नाही. जो भाजप उमदेवार ठरवेल तोच कल्याण लोकसभेचा उमेदवार असेल, अशी भूमिका जाहीर केली होती. यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला. या वादात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उडी घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक बागडे यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे. त्यांनी बागडे यांच्या मालमत्तेची यादी वाचून दाखवली. यामुळे बागडे यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news