गोव्यात गुंतवणूक करा; गोव्याला विकसित करण्यात हातभार लावा : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी : विठ्ठल गावडे पारवाडकर गोव्यात या, गुंतवणूक करा व स्वता:चा विकास करतानाच गोव्याला विकसित करण्यात हातभार लावा असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (सोमवार) केले. दोनापावला पणजी येथे आयोजित ईनवेस्ट गोवा २०२४ परीषदेचे उद्धाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी उद्योगमंत्री मावीन गुद्धीनो, गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदा  र आलेक्स रेजीनाल्ड व विविध उद्योग संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोव्यावर विशेष प्रेम आहे. डबल इंजिन सरकारमुळे गोव्यातील बंदरे, रेल्वे स्टेशन, वाहतूक व्यवस्था यांचा विकास झालेला असून, नवे विमानतळ, महामार्ग बांधले गेले आहेत.

गोवा पर्यटन राज्य आहेच पण, त्याचसोबत ते सांस्कृतीक राज्यही आहे. गोवा ईकॉनॉमिक पावर हब व्हावे यासाठी सरकारने गुंतवणूकदारांसाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हीच योग्य वेळ आहे, गुंतवणूक करण्याची. गुंतवणूक करा असे आवाहन त्यांनी परिषदेत उपस्थित शेकडो उद्योजकांना केले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news