चिंताजनक ! शिकवण्याऐवजी शिक्षक मोबाईलमध्ये व्यस्त; मुलांकडून शिक्षकांच्या नकला

चिंताजनक ! शिकवण्याऐवजी शिक्षक मोबाईलमध्ये व्यस्त; मुलांकडून शिक्षकांच्या नकला

संगमनेर शहर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : सुकेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नावलौकिक व गुणवत्ता असणारी शाळा, या शाळेत खाजगी शाळेतून विश्वासाने विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी दाखल व्हायचे. यामुळे शाळेची पटसंख्या वाढली, परंतु काही आळशी व राजकारणी शिक्षकांच्या वृत्तीमुळे अडीचशे पटसंख्या असलेल्या शाळेत फक्त दीडशे मुले शिल्लक राहिल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. जिल्हा परिषद ही गरीब, सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांसाठी हक्काची शाळा.

मात्र ढिसाळ कारभारामुळे शिकत असलेल्या मुलांना पालक दुसर्‍या शाळेत पाठवत आहेत. काही शिक्षकांच्या बेजबाबदार पणामुळे ही शाळा गावातील पुढार्‍यांचे वाढदिवस व कौतुक सोहळ्यांचे केंद्र बनली आहे. शाळा ही शाळा समिती, पुढारी व शाळेच्या इतर शिक्षकांचे रिमोट बनलेत. तुम्ही सांगाल ती दिशा व तेच धोरणं शाळेत राबवले जात आहेत.

शिक्षक मुलांना शिकवण्या ऐवजी तासंनतास मोबाईलवर बोलत बसतात, दिवसभर व्हाट्सएपवर ऑनलाईन असणे, सदस्य हाताशी धरून शाळेत व गावात राजकारण करणे, अशी चर्चा गावात आहे. दिवसभर गप्पा मारत बसणे, मुलांच्या शिकवण्याकडे दुर्लक्ष करणे, गटबाजी करून एकमेकांची जिरवाजीरव करणे. यात विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अनेकांना पुढार्‍यांसाठी दिवस रात्र वेळ असतो, पण पालकांना टाळले जाते.

शिक्षकांची गावात एवढी वट निमार्ण झाली आहे की आता ते शिक्षक फक्त ग्रामपंचायत निवडणूकीत उतरायचे बाकी असल्याचे बोलले जाते. पालकांनी समितीला, पुढार्‍यांना वारंवार सांगूनही त्यांच्या सूचनांचे पालन केले जात नाही. नागरिकांना शिक्षकांचे कौतुक सोहळे नव्हे विद्यार्थ्यांचे कौतुक सोहळे कधी पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे. चुकीच्या वागण्यामुळे, न शिकवल्यामुळे गावातील शाळेतील मुलांचे भवितव्य अंधारात दिसत आहे. याच कारणामुळे पालक आपल्या मुलांना खाजगी शाळेत पाठवण्याच्या तयारीत आहेत. गरीब परिस्थिती असल्यामुळे पैसा नाही, परंतु शाळेच्या व गावाच्या शाळा समितीच्या पदापाई चाललेले राजकारण पाहता मुलांचे भविष्य नक्कीच धोक्यात आहे.

मुलांना साधं लिहिता वाचता येऊ नये, अशी बोलकी प्रतिक्रिया पालक बोलली जात आहे. सोशल मीडियामार्फत शिक्षक व सदस्य शिक्षणाऐवजी नको त्या गोष्टींचा प्रसार जास्त करत आहे. मुलांना जेव्हा शाळेत काय शिकवले हे विचारले जाते तेव्हा मुले शिक्षकांची तंबाखू खाण्याची मिमिक्री करून दाखवतात. मुलांनो पळा वर्गाच्या बाहेर तिकडे लांब जाऊन खेळा नाहीतर तुम्हाला मार मिळेल असे शिक्षक म्हणतात आणि वर्गात मस्त ढाराढूर झोपा काढल्या जातात असा प्रकार सुकेवाडीतील शाळेत बघायला , ऐकायला मिळत आहे.

शिक्षक पगार घेतात कसला?

लहान मुलांवर संस्कार करण्यांचे काम प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे असतात. परंतु शासनाचा भरमसाठ , गलेलठ्ठे पगार घेऊन मुलांवर चांगले संस्कार व शिकवण्याकडे दुर्लक्ष करत शाळेत येऊन अंग ताणून ढाराढूर झोपा काढण्यांचे प्रकार संध्या अनेक शाळामध्ये दिसून येत आहे. मग हे शिक्षक शासनाचा भरमसाठ पगार घेतात कसले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news