पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस फेम अभिनेत्री उर्फी जावेद ( Urfi Javed ) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ याच्यात जोरदार वादावादी होत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी चित्रा वाघ यांनी उर्फीच्या तोकड्या कपड्यांवर आक्षेप घेत येणाऱ्या पिढीला ती बर्बाद करत असल्याचे म्हटले होते. यानंतर त्यांनी उर्फीविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तसेच त्यांनी महिला आयोग रुपाली चाकणकरांनी तिच्यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली होती. याच दरम्यान आता उर्फी जावेदने रुपाली चाकणकर यांची भेट घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन तिने चाकणकरांची भेट घेतली. या दोघींमध्ये आता काय चर्चा झालीय, हे अद्याप समजलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री उर्फी जावेद ( Urfi Javed ) राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन आज शुक्रावारी रुपाली चाकणकर यांची भेट घेणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. याशिवाय महिला आयोगाकडे स्वत: ला मारण्याची धमकी दिल्याबद्दल तक्रारदेखील दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे.
चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यामुळे महिला आयोगाला खडेबोल सुनावत त्याच्या कामावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस बजावली होती. त्या नोटीसीत महिला आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी दोन दिवसांत खुलासा करावा, असे देखील म्हटलं होतं.
याआधी चित्रा वाघ म्हणाल्या होत्या की, 'उर्फीच्या तोकड्या कपड्यामुळे येणाऱ्या पुढील पिढीवर असेच संस्कार होत आहेत. हे जर असेच चालले तर पुढील पिढी बर्बाद होईल. ती मुंबईच्या रस्त्यावर अशीच फिरू लागली आहे. मला जर भेटली तर तिला साडी- चोळी देऊन सन्मान करेन. परंतु, तरीही अशीच वागत राहिली तर तिला कानाखाली लगावेन' असे म्हटले होते. यानंतर चित्रा वाघ आणि उर्फीचा वाद पेटला.
हेही वाचलंत का?