INDvsZIM T20WC : झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडियाची प्लेइंग-11 ‘अशी’ असेल!

INDvsZIM T20WC : झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडियाची प्लेइंग-11 ‘अशी’ असेल!

पुढारी ऑनलाईन डेस्क : INDvsZIM T20WC : टी-20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारताचा सामना झिम्बाब्वेशी होणार आहे. सुपर 12 फेरीतील टीम इंडियाचा हा शेवटचा सामना आहे. रविवारी गट 2 चे तीन सामने होते. त्यातील पहिला सामना नेदरलँड विरुद्ध द. आफ्रिका या सामन्याचा निकाल लागला असून त्यात डच संघाने बाजे मारली आहे. द. आफ्रिका पुन्हा एकदा चोकर्स ठरला आहे. परिणामी या सामन्याच्या निकानंतर भारतीय संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहचणारा तिसरा संघ ठरला आहे. तर सेमी फायनलमध्ये फचणारा चौथा संघ कुठला असेला याचा निर्णय पाक विरुद्ध बांगलादेश या सामन्यानंतरच होणार आहे. दुसरीकडे भारतीय संघाचे झिम्बाब्वे विरुद्ध पारडे जड आहे. त्यामुळे या सामन्यात रोहित ब्रिगेड विजयी होईल यात शंका नाही.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात आतापर्यंत एकूण सात टी-20 सामने खेळले गेले आहेत. यातील 71 टक्के सामने भारताने जिंकले आहेत. म्हणजेच भारताने एकूण पाच सामने जिंकले आहेत, तर झिम्बाब्वेच्या संघाने केवळ दोनच सामने जिंकले आहेत. टी 20 विश्वचषकात दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येत आहेत. या सामन्यात अनेक विक्रमही होऊ शकतात. चला जाणून घेऊया…

विराट कोहली 4000 टी 20 आंतरराष्ट्रीय धावांपासून फक्त 68 धावा दूर आहे. सूर्यकुमार यादव 2022 च्या कॅलेंडर वर्षात टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हजार धावांचा टप्पा पार करू शकतो. त्याला एक हजार धावा पूर्ण करण्यसाठी 35 धावांची आवश्यकता आहे. त्याने आतापर्यंत 965 धावा केल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये, केवळ पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने एका कॅलेंडर वर्षात हजार धावा केल्या होत्या. 2021 मध्ये त्याने 1326 धावा केल्या होत्या.

2022 पूर्वी झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाने 42 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 524 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 13.43 आणि स्ट्राइक रेट 106.93 होता. या वर्षी त्याने 23 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 35.05 च्या सरासरीने आणि 151.40 च्या स्ट्राइक रेटने 701 धावा केल्या आहेत. आत्तापर्यंत त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सहा अर्धशतके झळकावली आहेत. यापैकी त्याने यावर्षी (2022) पाच अर्धशतके झळकावली आहेत.

मेलबर्नमध्ये यंदाच्या टी 20 विश्वचषकात आतापर्यंत पाच सामने आयोजित करण्यात आले आहेत. यातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना वगळता इतर सर्व सामन्यांवर पावसाचा परिणाम झाला. भारत-पाकिस्तान सामन्यानंतर इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यातील सामना पावसाने व्यत्यय आणला.

डकवर्थ-लुईस नियमानुसार या सामन्याचा निकाल जहीर करण्यात आला होत. त्यात आयर्लंड संघाला विजयी घोषित करण्यात आले होते. त्याचवेळी मेलबर्नमधील शेवटचे तीन सामने पावसाने वाहून गेल्याने एकही चेंडू टाकता आला नाही. रविवारी पावसाची शक्यता नाही. तथापि, भारत-पाक सामन्यानंतर प्रथमच पूर्ण सामना खेळला जाऊ शकतो. अशा प्रकारे खेळपट्टी फ्रेश असेल. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत होऊ शकते.

भारतीय संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात कोणताही बदल करू शकत नाहीत. बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात खेळला गेलेला संघ मैदानात उतरू शकतो. गेल्या सामन्यात केएल राहुलने चांगली फलंदाजी केली होती. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धही तो मोठी खेळी करेल अशी आशा सर्वांना आहे. त्याचबरोबर रोहितकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. विराट कोहली उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याला बाद करण्यासाठी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना खूप मेहनत करावी लागणार आहे. सूर्यकुमार यादव मधल्या फळीत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टी-20 तील पहिल्या क्रमांकाचा हा फलंदाज त्याच्या झंझावाती खेळीने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची धुलाई कशी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोअर ऑर्डरमध्ये फलंदाजांच्या बॅटमधून धावा न येणे ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे. दिनेश कार्तिक आणि अक्षर पटेल यांना ही कमजोरी दूर करायची आहे. गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. बांगलादेशविरुद्धचा सामना वगळता भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग या जोडीने पॉवरप्लेमध्ये शानदार गोलंदाजी केली. त्याचवेळी मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्याही मधल्या षटकांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. डेथ ओव्हर्समध्येही या तीन वेगवान गोलंदाजांच्या त्रिकुटाने चांगली कामगिरी केली आहे. पण आर अश्विनला या सामन्यात संधी मिळेल की नाही टॉस नंतरच समेजेल.

त्याचवेळी झिम्बाब्वेबद्दल बोलायचे झाले तर सिकंदर रझा हा या संघाचा वन मॅन आर्मी आहे. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या सामन्यातही त्याच्याकडून संघाला मोठ्या आशा आहेत. याशिवाय वेस्ली माधवेअर, कर्णधार क्रेग इर्विन आणि शॉन विल्यम्स यांनाही फलंदाजीत चांगली कामगिरी करायला आवडेल. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. एन्गारवा, मुजरबानी आणि ब्रॅड इव्हान्स यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. सिकंदर रझा फिरकीची जबाबदारी सांभाळणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news