Indus Civilization : उल्कापातामुळे झाला होता सिंधू संस्कृतीचा विनाश?

Indus Civilization : उल्कापातामुळे झाला होता सिंधू संस्कृतीचा विनाश?
Published on
Updated on

कोची/नवी दिल्ली : मोठ्या आकाराच्या उल्का, Indus Civilization लघुग्रह यांच्या पृथ्वीला झालेल्या धडकेने जीवसृष्टीचा मोठा र्‍हास झाल्याची इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. एका लघुग्रहाच्या धडकेमुळेच 6 कोटी 60 लाख वर्षांपूर्वी डायनासोरसह प्राणी व वनस्पतींच्या अनेक प्रजातींचा र्‍हास झाला होता. या लघुग्रहाच्या धडकेने मेक्सिकोमध्ये एक विवरही बनलेले आहे. सिंधू संस्कृतीचा नाशही अशाच मोठ्या उल्केच्या धडकेने झाला होता का, असा एक प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. याचे कारण म्हणजे संशोधकांनी गुजरातच्या कच्छमध्ये या उल्केमुळे निर्माण झालेले विवर शोधले आहे. तेथील वितळलेल्या दगडाचा नमुनाही शोधण्यात आला आहे. ज्याठिकाणी ही उल्का कोसळली होती ते सिंधू संस्कृतीशी निगडीत धोलावीरा या स्थळापासून केवळ 200 किलोमीटर अंतरावर आहे.

केरळ युनिव्हर्सिटीच्या प्राणीशास्त्र विभागाच्या संशोधकांनी गेली चार वर्षे याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांना आता 'मेल्ट रॉक्स'च्या रूपाने एक 'खजिना'च गवसला आहे. 'मेल्ट रॉक' म्हणजे वितळलेला दगड, जो एखाद्या उल्केचाही भाग असतो. एखादी जळती उल्का Indus Civilization कोसळल्याने असे मेल्ट रॉक्स बनतात. कच्छमधील लूना नावाच्या छोट्याशा भागात असा मेल्ट रॉक आढळला आहे. या मेल्ट रॉकच्या कार्बन डेटिंग चाचणीतून हे समजले की तब्बल 6900 वर्षांपूर्वी ही उल्का कोसळली होती. साधारणपणे याच काळात सिंधू संस्कृती बहरत होती. आता संशोधकांसमोर हा प्रश्न आहे की या उल्कापाताचा सिंधू संस्कृतीवर काही परिणाम झाला होता का?

400 मीटर आकाराची होती उल्का

केरळ युनिव्हर्सिटीतील सहायक प्राध्यापक रजिन कुमार के.एस. यांनी सांगितले की ही उल्का लूनामध्ये Indus Civilization कोसळली असली तरी सिंधू संस्कृतीमधील एक प्रसिद्ध ठिकाण धोलावीरा हे इथून सुमारे 200 किलोमीटरवरच आहे. या धोलावीरामध्ये सिंधू संस्कृतीमधील अनेक अवशेष सापडलेले आहेत. लूनामध्ये दोन किलोमीटर लांबीचे विवर आहे. त्यावरून असे दिसते की जी उल्का कोसळली तिचा आकार 200 ते 400 मीटर असावा. आपण उल्का कोसळल्याने वनस्पती, प्राणी लुप्त होण्याची नेहमीच चर्चा करतो; पण कधी मानवी संस्कृतीवरही त्याचा परिणाम झाला होता का, हे स्पष्ट नाही. त्यामुळे आमचे संशोधन याच दिशेने आहे की उल्कापातामुळे एखादी मानवी संस्कृती नष्ट झाली होती का?

चौथे विशाल विवर

उल्का Indus Civilization या आगीच्या गोळ्यासारख्या असतात. उल्कापाताने आसपासच्या अनेक वस्तू, दगड वितळतात आणि त्यापासून बनतात मेल्ट रॉक. लूनामधून घेतलेल्या नमुन्यांमध्ये वुस्टाईट, किरस्टेइनाइट, उल्वोस्पिनेल आणि हर्सिनाइटसारखे उच्च तापमानाचे खनिज आहेत. लूनामधील विवर हे उल्का कोसळल्याने निर्माण झालेल्या देशातील विवरांपैकी चौथे विवर आहे. लूनामधील उल्का ही कालगणनेनुसार सर्वात अलीकडची आहे. देशात ढाला (मध्य प्रदेश), रामगढ (राजस्थान) आणि लोणार (महाराष्ट्र) याठिकाणी अशी विवरे आहेत.

उल्केपेक्षा वीस पट मोठे खड्डे

उल्केमुळे Indus Civilization बनणारे खड्डे किंवा विवरे हे उल्केच्या आकाराच्या दहा ते वीस पट अधिक मोठे असतात. केरळ युनिव्हर्सिटीच्या टीमने 1 मीटरचा खड्डा खोदला होता. त्यांना सुमारे दहा सेंटीमीटरवरच नमुने मिळाले होते. त्यावरून असे दिसते की हे सर्वात युवा क्रेटर किंवा विवर आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news