Indrayani TV Serial : अवखळ इंदू येतेय भेटीला, “इंद्रायणी”च्या शीर्षकगीताला पसंती

indrayani
indrayani
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कलर्स मराठी वाहिनीवर २५ मार्चपासून "इंद्रायणी" मालिका पाहता येणार असून अवखळ इंदू तुमच्या भेटीला येतेय. इंद्रायणी म्हणजे अख्ख्या गावाची लाडकी इंदू, एक निरागस, निष्पाप, गोड, सालस, अवखळ आणि तितकीच विचारी मुलगी. (Indrayani TV Serial ) वय लहान परंतु बुद्धी मात्र मोठ्यांनाही अचंबित करणारी! इंदूच्या निरागस तरी मार्मिक प्रश्नांनी भल्याभल्यांना प्रोमोतच निरूत्तर केलंय आणि तितकंच तिचं अस्सल नि अवखळ बालपण अनेकांना आपल्या बालपणाची आठवणही करून देतंय. म्हणून या इंदूच्या भेटीसाठी रसिकांना उत्कंठा लागून राहिलीय. (Indrayani TV Serial )

आता या मालिकेचं एक गोड शीर्षकगीत रसिकांच्या भेटीला आलंय आणि इंदूइतकंच तेही लोकांना खूप आवडतंय. "गीत तुझं डोलण्याचं, वाऱ्यासंगं हालण्याचं..पाखरांशी बोलण्याचं, चांदण्यात चालण्याचं!! " असे या शीर्षकगीताचे बोल आहेत. इंदूचं भावविश्व मांडणारं हे अर्थपूर्ण शीर्षकगीत लिहिलंय, प्रसिद्ध गीतकार आणि कवी दासू वैद्य यांनी तर ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी ते संगीतबद्ध केलंय. तर राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र हिने हे गीत गायलंय. हे गाणं कलर्स मराठीच्या फेसबुक पेजवर आणि युट्युबवर रसिकांना पाहायला मिळेल.

इंदूची भूमिका करणारी बालकलाकार साताऱ्याची सांची भोईर सध्या लक्षवेधी ठरतेय. तसंच गुणी अभिनेत्री अनिता दाते आणि संदीप पाठक या मालिकेत आपल्या दमदार अभिनयाने रसिकांना पुन्हा एकदा सुखद धक्का देतील. या दोन तगड्या कलाकारांबरोबर "जय जय स्वामी समर्थ " मध्ये चोळप्पाच्या भूमिकेद्वारे रसिकांची मनं जिंकणारा स्वानंद बर्वे हा कलाकारही या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.

या मालिकेचं लेखन प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अभिनेता चिन्मय मांडलेकर करत आहे. मालिकेचे दिग्दर्शन विनोद लव्हेकर करत आहेत. 'जीव झाला येडापिसा' , 'राजारानीची गं जोडी' आणि 'पिरतीचा वनवा उरी पेटला' या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकांची निर्मिती करणाऱ्या पोतडी एंटरटेनमेंट या मालिकेची निर्मिती करत आहेत. याच मालिकांचे दिग्दर्शक विनोद लव्हेकर "इंद्रायणी"चे दिग्दर्शन करत आहेत.

" इंद्रायणी" कलर्स मराठीवर २५ मार्चपासून सायं ७ वाजता पाहता येईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news