Indonesia Earthquake: इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे भूकंप, 44 ठार तर 300 जखमी

Indonesia Earthquake: इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे भूकंप, 44 ठार तर 300 जखमी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन, Indonesia Earthquake : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. यादरम्यान 44 जणांना आपला जीव गमवावा लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याचवेळी 300 हून अधिक लोक जखमी झाल्याचे समजते आहे. एएफपी न्यूज एजन्सीने ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. मृतांचा आकडा अजून वाढू शकतो, असेही सांगण्यात आले आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम जावाच्या सियांजूरमध्ये 10 किमी खोलीवर होता. मात्र, यामुळे सुनामी येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली नाही. सियांजूरच्या प्रशासकीय अधिका-यांच्या माहितीनुसार, एका रुग्णालयात सुमारे 20 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि किमान 300 लोकांवर उपचार सुरू आहेत. इमारतींमध्ये अडकल्यामुळे अनेक लोक जखमी झाले आहेत. जकार्तामध्ये भूकंपानंतर लोक घाबरले. कार्यालयात काम करणारे लोकही बाहेर पडले. भूकंपाच्या धक्क्यांमुळे इमारत हादरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला.

शुक्रवारी रात्री सुद्धा पश्चिम इंडोनेशियामध्ये भूकंपाचा धक्का बसला होता. या काळात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने (यूएसजीएस) भूकंपाची तीव्रता 6.9 इतकी नोंदवली होती. त्याचा केंद्रबिंदू दक्षिण बेंगकुलूपासून 202 किमी नैऋत्येस 25 किमी खोलीवर होता. यानंतर दुसरा धक्का बसला, ज्याची तीव्रता 5.4 होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news