मंगळयानाचा संपर्क तुटला; ८ वर्षांनंतर मोहीम संपुष्टात

मंगळयानाचा संपर्क तुटला; ८ वर्षांनंतर मोहीम संपुष्टात

नवी दिल्ली : भारताची मंगळयान मोहीम 8 वर्षे आणि 8 दिवसांनंतर संपुष्टात आली आहे. भारताने केवळ 6 महिन्यांचा कालावधी अपेक्षित धरून यान पाठवलेले असताना तब्बल 16 पट कालावधीपर्यंत ते संपूर्ण क्षमतेने कार्यरत राहिले होते. मंगळयानातील इंधन आणि बॅटरी संपल्याने ही मोहीम संपली आहे.

भारताने मंगळयान 5 नोव्हेंबर 2013 रोजी प्रक्षेपित केले होते. ते 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळाच्या कक्षेत पोहोचले होते. इस्रोतील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळयानातील इंधन आणि बॅटरी संपली आहे. त्यामुळे भारताची ही मोहिम संपुष्टात आली आहे. संपर्क तुटल्याने 'मंगळयान' आपला दीर्घ टप्पा पूर्ण करून अवकाशात विलीन होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मंगळ ग्रहापर्यंत पोहोचणारा भारत जगातील पहिला देश बनला होता. मंगळयान मिशनसाठी 450 कोटी रुपयांचा खर्च आला होता. 8 वर्षे आणि 8 दिवसांनंतर भारताची ही मोहीम संपुष्टात आली आहे.

५ विशेष साधनांचा मंगळयानात होता समावेश

मंगळयान MOM म्हणजेच एक प्रौद्योगिकी प्रदर्शन उद्यम, भूगर्भशास्त्र, आकृति विज्ञान, वायुमंडलीय प्रक्रिया, पृष्ठभागाचे तापमान आणि वातावरणीय प्रक्रिया यावर डेटा गोळा करणाऱ्या पाच वैज्ञानिक पेलोड उपकरणांसह तयार करण्यात आले होते. यामध्ये मार्स कलर कैमरा (एमसीसी), थर्मल इन्फ्रारेड इमेजिंग स्पेक्ट्रोमीटर (टीआयएस), मिथेन सेन्सर फॉर मार्स (एमएसएम), मार्स एक्सोस्फेरिक न्यूट्रल कंपोझिशन एनालायजर (एमइएनसीए) आणि लाइमैन अल्फा फोटोमीटर (एलएपी) यांचा समावेश होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news