देशाच्या विदेशी चलन साठ्यात 2.9 अब्ज डॉलर्सची घट

देशाच्या विदेशी चलन साठ्यात 2.9 अब्ज डॉलर्सची घट
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : 23 जून रोजी संपलेल्या आठवड्यात देशाच्या विदेशी चलन साठ्यात 2.90 अब्ज डॉलर्सने घट झाली असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी दिली. ताज्या आकडेवारीनुसार विदेशी चलन साठा 593.19 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आला आहे.

मागील काही काळात देशातील विदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला असला तरी विदेशी चलन साठ्याचे प्रमाण सर्वकालीन उच्चांकी स्तरापासून दूर आहे. विदेशी चलन साठ्याचा सर्वकालीन स्तर ऑक्टोबर 2021 मध्ये गाठला गेला होता. त्यावेळी हा साठा 645 अब्ज डॉलर्सवर गेला होता. 23 जून रोजी संपलेल्या आठवड्यात विदेशी चलन साठ्यातील विदेशी चलन मालमत्तेचे प्रमाण 2.21अब्ज डॉलर्सने कमी झाले आहे. हे प्रमाण आता 525 अब्ज डॉलर्सवर आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news