IND vs ZIM 2nd ODI : झिम्बाब्वेचा डाव १६१ धावांमध्‍ये आटोपला, शार्दुल ठाकूरचे तीन बळी

IND vs ZIM 2nd ODI : झिम्बाब्वेचा डाव १६१ धावांमध्‍ये आटोपला, शार्दुल ठाकूरचे तीन बळी

पुढारी ऑनलाईन डेस्क :  (IND vs ZIM)दुसर्‍या वन डे सामन्‍यात झिम्‍बाब्‍वेचा डाव १६१ धावामंध्‍ये आटोपला. पहिल्‍या वन डेमध्‍ये नवव्‍या विकेटसाठी ७० धावांची भागेदारी झाली होती. मात्र आज अखेरची दोन्‍ही खेळाडू धावचीत झाले. सर्वाधिक ४२ धावा विलियम्‍सने केल्‍या. तर रेयान बर्ल याने ३९ धावांची खेळी केली. भारताचा गोलंदाज शार्दुल ठाकूर याने तीन बळी घेतली. बाकी सर्व गोलंदाजांनी प्रत्‍येकी एक बळी घेत. अवघ्‍या १६१ धावांमध्‍ये झिम्‍बाब्‍वेचा डाव गुंडाळला.

नाणेफेक जिंकत भारताचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्‍याचा हा निर्णय योग्‍य ठरला. झिम्‍बाब्‍वेने ३८. १ षट्‍कांमध्‍ये १६१ धावांवर आलआउट झाला. झिम्‍बाब्‍वला पहिला धक्‍का वेगवाग गोलंदाज मोहम्‍मद सिराज याने दिला. त्‍याने ताकुडझ्वानाशे कैटानो याला सात धावांवर बाद केले. विकेटकीपर संजू सॅमसनने कैटानाे याचा उत्‍कृष्‍ट झेल घेतला. यानंतर दीपक चहर ऐवजी खेळणार्‍या शार्दुल ठाकूरने सलग दाेन विकेट घेतल्‍या. त्‍याने सलामीवरी इनोसंट कैया याला १६ धावांवर तर दाेन धावांवर खेळणार्‍या कर्णधार रेगिस चाकाब्वा याला शुभमन गिलकडे झेल देणे भाग पाडले.

प्रसिद्ध कृष्णा गाेलंदाजीवर वेस्ली मधेवेरे याने  विकेटकीपर संजू सॅमसनकडे साेपा झेल दिला.  फिरकीपटू कुलदीप यादव याने सिकंदर राजा याला १६ धावांवर बाद केले. या मालिकेतील कुलदीप याचीही पहिलीच विकेट ठरली. ४२ धावांवर खेळणार्‍या शॉन विल्यम्सला दीपक हुडाच्‍या बाद केले. त्‍याचा झेल शिखर धवनने घेतला.

झिम्‍बाब्‍वेला सातवा धक्‍का शार्दूल ठाकूरने दिला. त्‍याने ल्यूक जोंगवे याला बाद करत या सामन्‍यातील तिसरी विकेट घेतली. यानंतर अक्षर पटेल याने ब्रॅड इव्हान्स याला .ित्रफळाचीत केले. यानंतर पुढील दाेन्‍ही फलंदाज धावचीत झाले.

एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाचा उपकर्णधार शिखर धवनने शानदार अर्धशतकी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. यावेळी शुभमन गिल आणि शिखर धवन या सलामीवीर फलंदाजांनी नाबाद राहून सामन्यात विजय मिळवला हाेता. (IND vs ZIM)

भारत संघ : शिखर धवन, शुभमन गिल, इशान किशन, केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज

झिम्बाब्वे संघ : इनोसंट कैया, ताकुडझ्वानाशे कैटानो, वेस्ली मधेवेरे, शॉन विल्यम्स, सिकंदर रझा, रेगिस चाकाब्वा (विकेटकीपर/कर्णधार), रायन बर्ल, ल्यूक जोंगवे, ब्रॅड इव्हान्स, व्हिक्टर न्याउची, तनाका चिवांगा


हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news