Dutee Chand : कॅन्सरवरील औषधांमधून ‘एसएआरएम’ पोटात गेले

Dutee Chand
Dutee Chand
Published on
Updated on

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : एशियन गेम्समध्ये दोनवेळा रौप्यपदक पटकावणारी भारताची धावपटू द्युती चंद (Dutee Chand) वर उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळल्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. यानंतर द्युती चंदने या प्रकरणात ओडिशा राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आपली मदत करावी, अशी विनंती केली आहे. काही दिवसांपूर्वी मला कर्करोगाचे निदान झाले होते, त्याची वेदना कमी होण्यासाठी काही औषधे घेत होते. त्याच्यामधूनच बंदी असलेले 'एसएआरएम' पोटात गेले. मला ही औषधे उत्तेजक द्रव्य असल्याचे माहीत नव्हते, असे द्युती चंद म्हणाली.

राष्ट्रीय उत्तेजक द्रव्यविरोधी संस्थेने (नाडा) द्युती चंदवर चार वर्षांची बंदी घातली आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात दोन डोपिंग टेस्टमध्ये चंदच्या रक्ताच्या नमुन्यात बंदी असलेले उत्तेजक द्रव्य सापडले होते. त्यानंतर तिच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली.

द्युती चंदने सांगितले की, तिला डॉक्टरांनी स्टेज 1 चा कॅन्सर झाला असल्याचे कळवले. तिने खेळातून निवृत्ती घेण्याची गरज आहे, असेही डॉक्टरांचे मत आहे. द्युती म्हणाली की, माझ्या आयुष्यात जे काही होत आहे ते पाहून मी खूप घाबरले आहे. मी एमआरआय स्कॅन केला त्यावेळी डॉक्टरांनी मला स्टेज 1 चा कॅन्सर असल्याचे सांगितले. मी वेदना कमी होण्यासाठी काही औषधे घेत होते. मला ही औषधे उत्तेजक द्रव्य असल्याचे माहिती नव्हते. द्युतीचे वकील पार्थ गोस्वामी यांनीही अजानतेपणातून तिच्याकडून हे घडले असल्याचे सांगितले.
या कारवाईनंतर द्युती चंदने 'एएनआय'ला प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, मला बंदीची बातमी शुक्रवारी कळाली. माझ्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. मला या निर्णयामुळे धक्का बसला तसेच खूप दुःखदेखील झाले. (Dutee Chand)

'नाडा'ने घातलेली बंदी ही यावर्षी 3 जानेवारीपासून लागू होणार आहे. द्युतीच्या रक्ताचे नमुने हे 5 डिसेंबरला घेण्यात आले होते. या काळात पात्र झालेल्या स्पर्धांमधून तिला अपात्र करण्यात आले आहे. तिने मिळवलेली सर्व पदके, गुण आणि बक्षिसेदेखील काढून घेण्यात येणार आहेत.

27 वर्षांची द्युती म्हणते की, माझ्या मते, भारतात आतापर्यंत कोणत्याही खेळाडूवर 4 वर्षांची बंदी घालण्यात आलेली नाही. मला या निकालाविरुद्ध दाद मागण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी मिळाला आहे. मी पुन्हा एकदा दाद मागणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news