Indian Navy Helicopter | भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरला मुंबई किनाऱ्याजवळ अपघात, तिघांना वाचवले

Indian Navy Helicopter | भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरला मुंबई किनाऱ्याजवळ अपघात, तिघांना वाचवले
Published on
Updated on

मुंबई : पुढारी ऑनलाईन; भारतीय नौदलाच्या एका अ‍ॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टरला (Indian Navy Helicopter) मुंबईपासून नियमित उड्डाण करत असताना अपघात झाला आहे. ही घटना मुंबईतील किनाऱ्याजवळ घडली आहे. या घटनेनंतर तात्काळ शोध आणि बचावकार्य करण्यात आले. नौदलाच्या गस्ती पथकाद्वारे तिघांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे भारतीय नौदलाने म्हटले आहे.

भारतीय नौदलाच्या स्वदेशी ध्रुव अ‍ॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टरने (ALH) बुधवारी मुंबईच्या किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात आपत्कालीन लँडिंग केले. नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, हे हेलिकॉप्टर मुंबईपासून नियमित उड्डाणावर होते, तेव्हा ते किनार्‍याजवळ अचानक खाली आले. त्यामुळे तातडीने शोध आणि बचाव मोहीम हाती घेण्यात आले. ध्रुव हेलिकॉप्टरमधील तिन्ही क्रू मेंबर्सना नौदलाच्या गस्ती पथकाने वाचवले असून या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. (Indian Navy Helicopter)

ALH ध्रुव हे ५.५ टन वजनाच्या श्रेणीतील ट्विन इंजिन, मल्टी-रोल, मल्टी-मिशन न्यू जनरेशन हेलिकॉप्टर आहे आणि ते सेंटर फॉर मिलिटरी एअरवॉर्थिनेस सर्टिफिकेशनने (CEMILAC) लष्करी ऑपरेशन्ससाठी 'type–Certified ' केले आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news