परदेशी पाहुण्यांसाठीच्या मेजवानीवरही भारतीय आहार संस्कृतीची छाप

परदेशी पाहुण्यांसाठीच्या मेजवानीवरही भारतीय आहार संस्कृतीची छाप
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  श्री अन्नापासून (भरड धान्यतयार केलेले दही गोळेकलौंजी पेरलेले मुंबई पावदूध साखर आणि गव्हापासून तयार केलेली वेलचीच्या चवीची मुलायम रोटीअंजीर पीचचा मुरंबाकाश्मीरी कहवादार्जिलिंग चहा…. हा मेन्यू आहे जी२० शिखर परिषदेसाठी भारतात आलेल्या परदेशी पाहुण्यांसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेल्या मेजवानीचाशरद ऋतुतील हवामानानुसार मेजवानीचा मेन्यू तयार करण्यात आला होताअर्थातया मेजवानीवर भारतीय आहार संस्कृतीची छाप राखताना परदेशी पाहुण्यांसाठी पूर्णतः शाकाहारी व्यंजने ठेवण्यात आली होती.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी२० शिखर परिषदेसाठी आलेल्या अमेरिकेच्या राष्ट्रपतींपासून ते आफ्रिकी संघाच्या प्रमुखांपर्यंत अशा सर्व पाहुण्यांना राष्ट्रपती भवनात मेजवानी दिलीया मेजवानीसाठी केंद्रीय मंत्रीराज्यपाल आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण देण्यात आले होतेमेजवानीचा मेन्यू देखील जी२० परिषदेच्या वसुधैव कुटुंबकम – एक पृथ्वीएक कुटुंबएक भविष्य या घोषवाक्याला समर्पीत होताभारतीय परंपराचालीरिती व खाद्यसंस्कृती लक्षात घेऊन आणि शरद ऋतुतील हवामानाला अनुसरून या मेजवानीसाठी मेन्यू तयार करण्यात आला होताभारतीय पाककलेची वैविध्यता दर्शविणाऱ्या या मेन्यूमध्ये स्टार्टर म्हणून दही गोळे आणि मसालेदार चटणीने नटलेले कुरकुरीत कंगनी श्रीअन्न लिफ क्रिस्प्स त्यानंतर मुख्य भोजनात ग्लेज्ड फॉरेस्ट मश्रूमकुटकी श्रीअन्न क्रिस्प आणि कढीपत्ते घालून तयार केलेला केरळी लालभात आणि फणसाचे गॅलेट

यासोबतचभारतीय रोटी मध्ये कलौंजी (कांद्याचे बीघालून तयार केलेला मुंबई पाववेलचीच्या स्वादाची गोडसर बाकरखानी रोटी त्याचप्रमाणे काश्मिरी कहवादार्जिलिंग चहामुंबई पावअंजीरपीच मुरंबा यासारख्या लज्जतदार पदार्थांची रेलचेल आणि जोडीला गंधर्व अतोद्यं या संगीताच्या सुरांची साथ हे राष्ट्रपतींच्या मेजवानीचे वैशिष्ट्य राहिलेआलेल्या पाहुण्याचे नालंदा विद्यापीठाच्या पार्श्वभूमीवर स्वागत करण्यात आले. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news