Canada Open 2023 | लक्ष्य सेनची कॅनडा ओपनवर मोहर, ऑल इंग्लंड चॅम्पियन ली शी फेंगवर केली मात

Canada Open 2023 | लक्ष्य सेनची कॅनडा ओपनवर मोहर, ऑल इंग्लंड चॅम्पियन ली शी फेंगवर केली मात

Published on

कॅलगेरी : पुढारी ऑनलाईन : भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन (Lakshya Sen) याने कॅनडा ओपन २०२३ स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. सोमवारी पहाटे झालेल्या अंतिम फेरीत लक्ष्यने चीनच्या ली शी फेंगचा २१-१८ आणि २२-२० अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. २१ वर्षीय लक्ष्य सेनने पहिला सेट २१-१८ आणि दुसरा सेट २२-२० असा जिंकून ऑल इंग्लंड चॅम्पियन असलेल्या ली शी फेंगवर विजय मिळवला. (Canada Open 2023)

कॅनडा ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेन याने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सेमीफायनलमध्ये त्याने जपानच्या केंटा निशिमोटो याला सरळ गेममध्ये पराभूत केले. महिला गटात भारताच्या पी.व्ही. सिंधू हिला मात्र यामागुची हिच्याकडून सेमीफायनलमध्ये पराभूत व्हावे लागले.

राष्ट्रकुल स्पर्धेचा सुवर्णपदक विजेता लक्ष्य सेन याच्या या हंगामाची सुरुवात चांगली झाली नव्हती, त्यामुळे तो १९ व्या स्थानावर घसरला होता; पण या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात त्याने अकराव्या मानांकित केंटो निशिमोटो याला २१-१७, २१-१४ असे हरवले होते. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक विजेता असलेला लक्ष्यने फायनलमध्ये चीनच्या ली शी फेंग याला हरवले.

कॅनडा ओपनच्या ३२ च्या राउंडमध्ये लक्ष्य सेनचा सलामीचा सामना थायलंडचा बॅडमिंटनपटू कुनलावूत विटिडसर्नशी झाला होता. लक्ष्यने त्याचा २१-१८ आणि २१-१५ असा पराभव केला होता.

१६व्या राउंडमध्ये लक्ष्यचा सामना ब्राझीलच्या यगोर कोएल्हो डी ऑलिव्हिराशी झाला. लक्ष्यने त्याच्यावर २१-१५ आणि २१-११ असा विजय मिळवला.

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्याचा सामना जर्मनचा ज्युलियन कॅरागीशी झाला. लक्ष्य सेनचा हा एकमेव सामना होता जो कॅनडा ओपनमध्ये तिसऱ्या सेटपर्यंत रंगला. लक्ष्यने पहिला सेट २१-८ ने जिंकला पण दुसऱ्या सेटमध्ये ज्युलियनने कडवी झुंज देत २१-१७ ने सेट जिंकला. पण लक्ष्यने चुरशीच्या सामन्यात तिसरा सेट २१-१० ने आपल्या नावे करत बाजी मारली.

दरम्यान, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी कॅनडा ओपनमधील (Canada Open 2023) अभूतपूर्व कामगिरीबद्दल लक्ष्य सेनचे अभिनंदन केले आहे.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news