INDvsSA : भारताचा ऐतिहासिक विजय!, सेंच्युरियन पार्कवर दक्षिण आफ्रिकेला 113 धावांनी हरवले

IND vs SA 1st Test भारताचा ऐतिहासिक विजय!, सेंच्युरियन पार्कवर दक्षिण आफ्रिकेला 113 धावांनी हरवले
IND vs SA 1st Test भारताचा ऐतिहासिक विजय!, सेंच्युरियन पार्कवर दक्षिण आफ्रिकेला 113 धावांनी हरवले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs SA 1st Test Day 5 : भारतीय संघाने आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 113 धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने सेंच्युरियनच्या मैदानावर इतिहास रचला. सेंच्युरियनच्या मैदानावर आफ्रिकेला कसोटी सामन्यात पराभूत करणारा भारत हा पहिला आशियाई संघ ठरला. 305 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणार्‍या दक्षिण आफ्रिकेला भारताने 191 धावांतच गुंडाळले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी घेतली. पहिल्या डावातील शतकवीर के. एल. राहुलला 'सामनावीर'चा पुरस्कार देण्यात आला.

भारताने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात भारताने सर्वबाद 327 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने 197 धावांच केल्या. त्यामुळे भारताला 130 धावांची आघाडी मिळाली. दुसर्‍या डावात भारताने सर्वबाद 174 धावा केल्या आणि आफ्रिकेला विजयासाठी 305 धावांचे आव्हान दिले. मात्र, आफ्रिकेचा संघ 191 धावांच करू शकला.

पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा डीन एल्गर आणि टेम्बा बावुमा जोडी मैदानात जमली होती. मात्र, एल्गर 77 धावांवर असताना जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर पायचित झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला क्विंटन-डी-कॉक थोडा आक्रमक खेळ करीत होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज सामना वाचवण्यापेक्षा जिंकण्यासाठी खेळतात असे चित्र दिसत होते. परंतु, डी-कॉकचा आक्रमक बाणा जास्त काळ मैदानात तग धरू शकला नाही. क्विंटन-डी-कॉक 21 धावांवर असताना मोहम्मद सिराजने त्याचा त्रिफळा उडवला.

व्हियान मुल्डर क्विंटन पाठोपाठ बाद झाला. मुल्डरने 3 चेंडूंत अवघी एक धाव केली. शमीच्या गोलंदाजीवर पंतने त्याचा झेल घेतला.
उपहाराला खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या 7 बाद 182 धावा झाल्या होत्या. भारताला विजयासाठी फक्‍त तीन चांगल्या चेंडूंची आवश्यकता होती. उपहारानंतर दोन षटकांतच दक्षिण आफ्रिकेचा खेळ खल्‍लास झाला. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मार्को जेन्सेन 13 धावा करून तंबूत परतला. ऋषभ पंतने त्याचा झेल घेतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कॅगिसो रबाडाला आपले खातेही खोलता आले नाही. अवघ्या 4 चेंडूंत त्याने शून्य धावा केल्या. त्याचा आर. अश्‍विनच्या गोलंदाजीवर मोहम्मद शमीने त्याचा झेल घेतला. त्यानंतर लुंगी एन्गिडी दुसर्‍या चेंडूवर बाद झाला आणि भारताला विजय मिळाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news