India Vs West Indies : इशान की भरत?

India Vs West Indies : इशान की भरत?
Published on
Updated on

बार्बाडोस, वृत्तसंस्था : भारतीय संघ वेस्ट इंडिज दौर्‍याची (India Vs West Indies) सुरुवात कसोटी मालिकेने करणार आहे. 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे. पहिली कसोटी डॉमिनिका येथे खेळली जाईल. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मासाठी यष्टिरक्षकाची निवड करणे खूप कठीण काम असणार आहे. के.एस. भरत आणि इशान किशन यांचा यष्टिरक्षक म्हणून कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे.

ऋषभ पंतनंतर टीम इंडियाने बॅकअप विकेटकिपर के.एस. भरतवर विश्वास दाखवला होता. भरतने यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीद्वारे कसोटी पदार्पण केले. भरतला आतापर्यंत फलंदाज म्हणून विशेष काही करता आलेले नाही. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या चार सामन्यांत फलंदाजी करताना त्याने 101 धावा केल्या. यादरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 44 धावांची होती.

याशिवाय नुकत्याच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये केएस भरतलाही संधी देण्यात आली होती. तिथेही तो बॅटने फ्लॉप दिसला. त्याने दोन्ही डावात केवळ 28 धावा केल्या. भरतची ही कामगिरी पाहून त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कुठे तरी बाहेरचा रस्ता दाखवल्या जाऊ शकतो, अशी अटकळ बांधली जात आहे. (India Vs West Indies)

केएस भरतच्या पदार्पणापासूनच इशान किशन भारतीय कसोटी संघासोबत बॅकअप यष्टिरक्षक म्हणून जात आहे. अशा परिस्थितीत इशान किशन वेस्ट इंडिज दौर्‍याद्वारे कसोटी पदार्पण करू शकतो. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये इशान किशनचे आकडे खूप चांगले आहेत. त्याचवेळी इशान फलंदाजीत आक्रमक वृत्ती स्वीकारतो. अशा परिस्थितीत तो संघासाठी उपयुक्तही ठरू शकतात.

इशानने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 48 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 2985 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 6 शतके झळकली आहेत. अशा स्थितीत त्याचे कसोटी पदार्पण निश्चित असल्याचे मानले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news