SA vs IND : द. आफ्रिकेला पहिला झटका, एडन मार्कराम बाद

SA vs IND : द. आफ्रिकेला पहिला झटका, एडन मार्कराम बाद
SA vs IND : द. आफ्रिकेला पहिला झटका, एडन मार्कराम बाद
Published on
Updated on

जोहान्सबर्ग : पुढारी ऑनलाईन

जोहान्सबर्ग येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पहिला डाव 202 धावांवर आटोपला. कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक 50 धावा केल्या. रविचंद्रन अश्विनने 46 धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जेन्सनने 4 बळी घेतले. डॅन ऑलिव्हियर आणि कागिसो रबाडाने प्रत्येकी 3 बळी घेतले. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दुखापतीमुळे विराट कोहली हा सामना खेळत नसून त्याच्या जागी राहुल संघाचा कर्णधार आहे. द. आफ्रिकेच्या पहिल्या डावाला सुरुवात झाली असून सध्या त्यांची धावसंख्या १ बाद १५ आहे.

भारताचे अनेक दिग्गज फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरले. मयंक अग्रवाल (26) चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करू शकला नाही आणि तो जेन्सनचा पहिला बळी ठरला. चेतेश्वर पुजारा (3) आणि अजिंक्य रहाणे (0) खराब फॉर्ममध्ये आहेत. या दोघांनाही सलग दोन चेंडूंवर ऑलिव्हियरने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर राहुल आणि हनुमा विहारी (20) यांनी चौथ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी करत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला.

विहारी कागिसो रबाडाच्या बाउन्सरवर झेलबाद झाला. 9 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर त्याला जीवदान मिळाले होते. पण त्याचा फायदा त्याला घेता आला नाही. ऋषभ पंत अवघ्या 17 धावांवर जेन्सनच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर अश्विनने आक्रमक खेळ करत भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले. बुमराहने नाबाद 14 धावा करत भारताला 200 चा टप्पा ओलांडून दिला.

भारताचा ऑलआऊट…

भारताचा ६३.१ षटकांत २०२ धावांवर ऑलआऊट झाला. शेवटची विकेट मोहम्मद सिराजची पडली. तर जसप्रीत बुमराह नाबाद राहिला.

नववा झटका…

६१ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर भारताला नववा धक्का बसला. मार्को जेन्सनने माघारी पाठवले. यावेळी भारताची धावसंख्या १८७ होती. अश्विनने ६ चौकारांच्या मदतीने ५० चेंडूत ४६ धावांची खेळी साकारली.

आठवी विकेट…

भारताची आठवी विकेट मोहम्मद शमीच्या रुपात पडली. त्याला ६० व्या षटकाच्या तिस-या चेंडूवर रबाडाने कॉट ॲन्ड बोल्ड केले. शमीने १२ चेंडूत ९ धावा केल्या.

सातवा धक्का…

५५ व्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर शार्दुल ठाकूर बाद झाला. त्याची विकेट डुआन ऑलिव्हियरने घेत भारताला सहावा झटका दिला. कीगन पीटरसनने शार्दुलचा झेल पकडला. शार्दुल ५ चेंडू खेळून शुन्यावर बाद झाला.

भारताला सहावा झटका..

५४ व्या षटकाच्या ३ -या चेंडूवर ऋषभ पंत बाद झाला. त्याचा अडसर मार्को जेन्सन याबे दूर केला. आणि त्याला तंबूत पाठवले. ऋषभ पंतने ४३ चेंडूत १७ धावा केल्या. विकेटकीपर काइल व्हेरेने याने त्याचा झेल पकडला. जेन्सनची ही तिसरी विकेट आहे. पंत आणि अश्विन जोडीने ४८ चेंडूत ४० धावांची भागीदारी केली.

भारताची पाचवी विकेट…

भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या केएल राहुलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील १३ वे अर्धशतक झळकावले. मात्र, त्यानंतर त्याची एकाग्रता भंगली आणि मार्को जेन्सनचा चेंडू स्टेडियमच्या बाहेर फटकावण्याच्या प्रयत्नात विकेट गमावून बसला. रबाडाने राहुलचा झेल टिपला. त्याने १३३ चेंडूत ५० धावा केल्या. त्यात नऊ चौकारांचा समावेश होता. ४६ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर तो बाद झाला.

भारताची चौथी विकेट…

३९ व्या षटकाच्या ४ थ्या चेंडूवर रबाडाने हनुमा विहारीला बाद केले. त्याचा झेल रॉसी व्हॅनडर डुसेनने पकडला. हनुमा ३ चौकारांच्या मदतीने ५३ चेंडूत २० धावा केल्या.

भारताला सलग दोन झटके, पुजारा आणि रहाणे बाद…

२३.३ आणि २३.४ व्या षटकात अनुक्रमे चेतेश्ववर पुजारा आणि अजिंक्य रहाणे बाद झाले. डुआन ऑलिव्हियरने भारताला सलग दोन झटके दिला. पुजारा ३३ चेंडूत ३ धावा करून माघारी परतला. त्याचा झेल बावुमाने पकडला. तर अजिंक्य रहाणे आल्याआल्या शुन्यावर बाद झाला. त्याच झेल कीगन पीटरसनने पकडला. चेतेश्वर पुजाराने गेल्या ४४ डावात एकही शतक झळकावू शकलेला नाही. तर अजिंक्य रहाणे दहाव्यांदा शून्यावर बाद झाला आहे. रहाणेने गेल्या २४ डावांत एकही शतक झळकावलेले नाही. रहाणेला बाद करून डॅन ऑलिव्हियरने आपल्या कसोटीतील ५० बळी पूर्ण केले.

भारताची पहिली विकेट…

१५ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मार्को जॅन्सनने मयंक अग्रवालची विकेट काढली आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. विकेटकीपर काइल व्हेरेने याने मयंकचा झेल पकडला. मयंकने ५ चौकार ठोकत ३७ चेंडूत २६ धावा केल्या.


भारताच्या १० षटकांत बिनबाद ३२ धावा…

भारताने १० षटकांत एकही विकेट न गमावता ३२ धावा केल्या. कर्णधार राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी संयमी फलंदाजी केली. बाहेर जाणाऱ्या चेंडूंवर भारतीय सलामीवीरांनी सावध फलंदाजीचे प्रदर्शन केले. रबाडाने एका टोकाकडून तर ऑलिव्हियरने दुसऱ्या टोकाकडून गोलंदाजी केली.

आफिकेचा रिव्ह्यू वाया…

ड्युएन ऑलिव्हियरने ८ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मयंक अग्रवालविरुद्ध कॅचचे जोरदार अपील करण्यात आले. विकेटकीपरने कॅच पकडल्याचा द. आफ्रिकेच्या गोलंदाजाचे म्हणणे होते. पण मैदानी पंचांनी नॉट आऊट असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर द. आफ्रिका संघाने रिव्ह्यू घेतला. रिप्लेमध्ये चेंडू मयंकच्या बॅटला न स्पर्श करता खांद्याला लागून विकेटच्यामागे यष्टीरक्षकाडे पोहोचल्याचे दिसून आले. त्यामुळे टीव्ही पंचांनी मैदानी पंचांचा निर्णय काम ठेवला.

जसप्रीत बुमराह उपकर्णधार…

या सामन्यात राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिल्यानंतर जसप्रीत बुमराहला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. तत्पूर्वी त्याच्याकडे वनडे मालिकेसाठी ही जबाबदारी देण्यात आली आहे. राहुल पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधार झाला आहे. यापूर्वी त्याने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचे नेतृत्व केले आहे. विराट कोहलीला पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. सामन्यापूर्वी त्याला वेदना होत होत्या.

विराट कोहली कसोटीमधून बाहेर…

टॉसच्या काही मिनिटे आधी विराट कोहली या सामन्यातून बाहेर पडल्याची बातमी समोर आली. त्याच्या जागी राहुल टॉससाठी आला. कोहलीच्या जागी हनुमा विहारीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोहलीला पाठीचा त्रास आहे. यामुळे तो हा सामना खेळत नाहीये. दक्षिण आफ्रिकेच्या संघातही दोन बदल करण्यात आले आहेत. क्विंटन डी कॉकच्या जागी काइल व्हर्नचा समावेश करण्यात आला आहे, तर डुआन ऑलिव्हरला विन मुल्डरच्या जागी संघात स्थान देण्यात आले आहे.

जोहान्सबर्गमध्ये टीम इंडियाने एकही कसोटी सामना गमावलेला नाही..

जोहान्सबर्गमध्ये भारतीय संघाने आतापर्यंत एकही कसोटी सामना गमावलेला नाही. १९९२ मध्ये २६ ते ३० नोव्हेंबर दरम्यान येथे पहिला कसोटी सामना खेळला होता. तो सामना अनिर्णित राहिला. यानंतर १९९७ मध्ये १६ ते २० जानेवारी दरम्यान खेळलेला सामनाही अनिर्णित राहिला. २००६ मध्ये या मैदानावर टीम इंडियाला पहिला विजय मिळाला होता. १५ ते १८ डिसेंबरपर्यंतचा तो सामना १२३ धावांनी जिंकण्यात भारतीय संघाला यश आले. दक्षिण आफ्रिकेतील कोणत्याही मैदानावरील हा पहिला कसोटी विजय होता. भारतीय संघ २०१८ मध्ये जोहान्सबर्ग येथे शेवटचा खेळला होता. २४ ते २७ जानेवारीपर्यंत चाललेला हा सामना विराट कोहलीच्या संघाने ६३ धावांनी जिंकला.

भारतीय संघ : केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

दक्षिण आफ्रिका संघ : डीन एल्गर (कर्णधार), एडेन मार्करम, कीगन पीटरसन, रसी वन डर डुसें, टेम्बा बावुमा, काइल वेरेने (विकेटकीपर), मार्को जानेसन, कगिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हर, लुंगी एन्गिडी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news