पुढारी ऑनलाईन डेस्क : R Ashwin 500 Test Wicket : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात ऑफस्पिनर आर अश्विनने इतिहास रचला. त्याने जॅक क्रॉलीला बाद करून कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमध्ये विकेट्सचा हा आकडा गाठणारा अश्विन हा अनिल कुंबळेनंतरचा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
रविचंद्रन अश्विनने 98 कसोटी सामन्यांच्या 184 डावात कसोटीत 500 बळी पूर्ण केले आहेत. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 500 बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने अनिल कुंबळेला मागे टाकले आहे. अनिल कुंबळेने 105 सामन्यांमध्ये 500 कसोटी बळी पूर्ण केले होते. त्याचबरोबर कसोटीत सर्वात जलद 500 बळी घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. मुथय्या मुरलीधरनने 87 कसोटी सामन्यात 500 विकेट घेतल्या आहेत. (R Ashwin 500 Test Wicket)
चेंडूंच्या बाबतीतही अश्विनने जेम्स अँडरसनचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट घेण्यासाठी एकूण 25,714 चेंडू टाकले तर जेम्स अँडरसनने यासाठी 28,150 चेंडू टाकले. आता जर आपण कमीत कमी चेंडूंमध्ये 500 कसोटी विकेट्स घेण्याबद्दल बोललो तर या यादीत आर अश्विन दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे तर जेम्स अँडरसन तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत 500 बळी घेण्याचा विक्रम ग्लेन मॅकग्राच्या नावावर आहे ज्याने 25,528 चेंडूत इतक्या विकेट्स घेतल्या. (R Ashwin 500 Test Wicket)
25528 चेंडू : ग्लेन मॅकग्रा
25714 चेंडू : आर अश्विन
28150 चेंडू : जेम्स अँडरसन
28430 चेंडू : स्टुअर्ट ब्रॉड
28833 बॉल : कोर्टनी वॉल्श
अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळींचा टप्पा गाठला आणि कसोटी क्रिकेटमध्ये 50, 100, 150, 200, 250, 300, 350, 400, 450, 500 बळी घेणारा भारतासाठी सर्वात वेगवान गोलंदाज बनला. याशिवाय कसोटी फॉरमॅटमध्ये 500 बळी घेणारा तो 9वा गोलंदाज ठरला. अश्विनच्या आधी या यादीत मुथय्या मुरलीधरन, शेन वॉर्न, जेम्स अँडरसन, अनिल कुंबळे, स्टुअर्ट ब्रॉड, ग्लेन मॅकग्रा, कोर्टनी वॉल्श आणि नॅथन लायन यांचा समावेश आहे.
800 : मुथय्या मुरलीधरन
708 : शेन वॉर्न
696 : जेम्स अँडरसन
619 : अनिल कुंबळे
604 : स्टुअर्ट ब्रॉड
563 : ग्लेन मॅकग्रा
519 : कोर्टनी वॉल्श
517 : नॅथन लिऑन
500* : अश्विन (वृत्त लिहिपर्यंत)
144 : मुथय्या मुरलीधरन
184 : रविचंद्रन अश्विन
186 : अनिल कुंबळे
201 : शेन वॉर्न
214 : ग्लेन मॅकग्रा
भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत आर अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. तर अनिल कुंबळे या यादीत आघाडीवर आहे. अनिल कुंबळेने भारताकडून कसोटीत एकूण 619 विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत अश्विनही दुस-या स्थानावर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 728 विकेट्स घेतल्या आहेत.