David Warner Record : अर्धशतक झळकावून डेव्हिड वॉर्नरने केली जयसूर्याची बरोबरी

David Warner Record : अर्धशतक झळकावून डेव्हिड वॉर्नरने केली जयसूर्याची बरोबरी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (David Warner Record) भारतीय क्रिकेट संघाविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावत एक विक्रम आपल्या नावावर केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक सलामी फलंदाज म्हणून सर्वाधिक 50+ धावा करणारा तो संयुक्तपणे दुसरा खेळाडू बनला आहे. याचबरोबर त्याने श्रीलंकेचा माजी खेळाडू सनथ जयसूर्याची बरोबरी केली आहे. या दोन्ही फलंदाजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीला येत 136 हून अधिकवेळा 50+ धावा केल्या आहेत.

वॉर्नरचे सलग तिसरे अर्धशतक (David Warner Record)

तिस-या वनडेत प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने डावाची सुरुवात झंझावाती पद्धतीने केली. त्याने 34 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 56 धावा तडकावल्या. वॉर्नरचे वनडे कारकिर्दीतील हे 31 वे आणि या मालिकेतील सलग तिसरे अर्धशतक ठरले.

वॉर्नरचा 150 वा एकदिवसीय सामना (David Warner Record)

याशिवाय वॉर्नरच्या वनडे कारकिर्दीतील हा 150 वा सामना होता. अशी कामगिरी करणारा तो 20 वा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. रिकी पाँटिंगने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने 374 एकदिवसीय सामन्यांमध्ये 13,589 धावा केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर स्टीव्ह वॉ (325), तिसऱ्या स्थानावर अॅडम गिलख्रिस्ट (286), चौथ्या स्थानावर अॅलन बॉर्डर (273), पाचव्या स्थानावर ग्लेन मॅकग्रा (249), सहाव्या स्थानावर मायकेल क्लार्क (245), 7व्या स्थानावर मार्क वॉ (244), 8व्या स्थानावर मायकेल बेवन (232), 9व्या स्थानावर ब्रेट ली (221) आणि 10व्या स्थानावर डॅमियन मार्टिन (208) आहे.

ख्रिस गेल अव्वलस्थानी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक 50+ धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने हा पराक्रम 144 वेळा केला आहे. यादीत तिसऱ्या क्रमांकावर डेसमंड हेन्स (131), चौथ्या क्रमांकावर ग्रॅमी स्मिथ (125), पाचव्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर (120), सहाव्या क्रमांकावर तमीम इक्बाल (119), सातव्या क्रमांकावर अॅलिस्टर कुक (110), 8व्या क्रमांकावर रोहित शर्मा (107), 9व्या क्रमांकावर मॅथ्यू हेडन (106) आणि 10व्या क्रमांकावर वीरेंद्र सेहवाग (103) आहे.

वॉर्नरची वनडे कारकीर्द

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे पदार्पण करणाऱ्या वॉर्नरने 148 डावांमध्ये 6,397 धावा केल्या आहेत. एक सलामीवीर म्हणून, त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 51 वेळा 50+ धावा केल्या यात (31 अर्धशतके आणि 20 शतकांचा समावेश आहे. कसोटीत सलामीचा फलंदाज म्हणून त्याने 61 पेक्षा जास्त वेळा (36 अर्धशतके, 25 शतके) 50+ धावा केल्या आहेत. तर टी-20 सामन्यांमध्ये 25 वेळा (24 अर्धशतके, 1 शतक) 50+ धावा फटकावल्या आहेत. यात त्याने एकदा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 77 धावा केल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news