पुढारी ऑनलाईन : विमा कंपनीने केलेल्या मार्केटच्या तुलनात्मक सर्वेक्षणातून ड्रायव्हिंग आणि ड्रायव्हर्स संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या सर्वेनुसार जगातील सर्वात खराब ड्रायव्हर्स असणाऱ्या यादीत भारत चौथ्या स्थानावर आहे. तर जपान हा चांगले ड्रायव्हर असणाऱ्या यादीतील पहिल्या क्रमांकावरील देश आहे.
जगातील ड्रायव्हर्सचे सर्वेक्षण करणाऱ्या विमा कंपनीने जगातील सर्वात उत्कृष्ट आणि सर्वात खराब ड्रायव्हर्सची यादी तयार केली आहे. यासाठी या संस्थेने ५० हून अधिक देशांमधील ड्रायव्हर्सचा अभ्यास केला आहे. यामध्ये कंपनीने व्यक्तिनिष्ठपणे तयार यादी तयार करून, विश्लेषण केले आहे.
जगातील सर्वात खराब ड्रायव्हर्स असणाऱ्या देशांच्या यादीत थायलंड अव्वल आहे, त्यानंतर पेरू आणि लेबनॉन सर्वात खराब ड्रायव्हर्सच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. जगातील सर्वोत्तम ड्रायव्हर्स असलेल्या देशांमध्ये नेदरलँड दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर नॉर्वेचा क्रमांक लागतो.