पुढारी ऑनलाईन डेस्क : मिशन चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंग आज यशस्वी झालं आहे. सगळ्या देशाचे याकडे लक्ष लागून राहिलेले होते. आता ही प्रतिक्षा संपली आहे. आज (दि. 23) संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चांद्रभूमीला स्पर्श केले. हे संपूर्ण मिशन हाताळणाऱ्या इस्रोच्या कक्षात जल्लोष साजरा करण्यात आला. या यशस्वी मोहिमेनंतर इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी संवाद साधला.
चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगसाठी इस्रोने काटेकोर नियोजन करुन सर्व आवश्यक काळजी घेतली आहे. अत्यंत छोट्यात-छोट्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करुन त्याचा मोहिमेत समावेश करण्यात आला आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर इस्रोच्या प्रमुखांनी आनंद व्यक्त केला. एस. सोमनाथ यांनी भाषणात सांगितले की, भारत आता चंद्रावर आहे.
हेही वाचा