T20 Records of India : ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवत भारताने दिला पाकला दणका, ‘हा’ विक्रम केला नावावर

T20 Records of India
T20 Records of India
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या टी २० मालिकेतील निर्णायक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने  टी-२० मालिका २-१ अशा फरकाने खिशात घातली. या सामन्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तानलाही मागे टाकले आहे. ( T20 Records of India)

भारताने २०२२ या वर्षात सर्वाधिक टी-२० सामने जिंकले आहेत. भारतीय संघाने २०२२ या वर्षात एकूण २९ टी-२० सामने खेळत २१ सामने जिंकले. फक्त सातच सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला तर एक सामना अनिर्णयीत राहिला आहे. २०२० या वर्षात पाकिस्तानने २० टी-२० सामन्यांत विजय मिळवला होता. यानंतर एका वर्षांत सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. तो आता भारताचा नावावर झाला आहे. (T20 Records of India)

रोहितने मोडला विराट कोहलीचा विक्रम ( T20 Records of India)

टी-२० क्रिकेटमध्ये रोहित शर्मा दुसरा सर्वाधिक यशस्वी कर्णधार बनला आहे. रोहित शर्माने ४२ सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. यातील ३३ सामने भारत जिंकले आहे. तर ९ टी-२० सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला. एम. एस. धोनीच्या नेतृत्वात भारताने एकूण ४२ सामने जिंकण्याचा विक्रम आहे.

विराटने राहुल द्रविडला टाकले मागे

विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात दमदार कामगिरी केली. त्याने ४८ चेंडूमध्ये ६३ धावांची खेळी केली. यानंतर विराटने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट दुसरा खेळाडू ठरला आहे. राहुल द्रविडला मागे टाकत विराटने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने भारतासाठी आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २४०७८ धावा केल्या आहेत. ( T20 Records of IndiaT20 Records of India)

आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा

सचिन तेंडुलकर : ६६४ सामने, ३४३५७ धावा

विराट कोहली : ४७१ सामने, २४०७८ धावा

राहुल द्रविड़ : ५०४ सामने, २४०६४

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news