Virat Kohli Record : सेंचुरियन टेस्ट जिंकून विराट कोहलीने रचला इतिहास!

Virat Kohli Record : सेंचुरियन टेस्ट जिंकून विराट कोहलीने रचला इतिहास!
Virat Kohli Record : सेंचुरियन टेस्ट जिंकून विराट कोहलीने रचला इतिहास!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाने सेंच्युरियन कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा 113 धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियातील गाबा नंतर भारताने सेंच्युरियनचे मैदान सर केले. ही खरोखरच मोठी कामगिरी आहे. चला तर सेंच्युरियन कसोटीत बनवलेल्या विक्रमाकडे एकनजर टाकूया… (Virat Kohli Record)

१. टीम इंडिया सेंच्युरियन मैदानावर कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई संघ ठरला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने सेंच्युरियन मैदानावर कसोटी जिंकली होती. सेंच्युरियनचे मैदान जिंकणारा विराट कोहली पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. तसेच भारतासाठी दोन बॉक्सिंग डे कसोटी सामने जिंकणाराही तो पहिला कर्णधार ठराला आहे. (Virat Kohli Record)

२. ऋषभ पंत विकेटमागे सर्वात जलद १०० विकेट घेणारा भारतीय यष्टीरक्षक ठरला. यापूर्वी हा विक्रम भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावावर होता.

३. जसप्रीत बुमराहने विदेशी मैदानावर १०० कसोटी बळी पूर्ण केले आहेत. हा टप्पा गाठण्यासाठी बुमराहने २३ (विदेशी मैदानावर) सामने खेळले.

४. परदेशी भूमीवर सर्वाधिक शतके (४) ठोकणारा केएल राहुल दुसरा सलामीवीर ठरला. त्यांच्या आधी सुनील गावस्कर यांनी परदेशात ८ शतके झळकावली आहेत.

५- केएल राहुल आणि मयंक ही जोडी दक्षिण आफ्रिकेत भारतासाठी १००+ धावांची सलामीची कसोटी भागीदारी करणारी तिसरी जोडी ठरली.

६. हा सामना जिंकून विराट कोहलीने रिकी पाँटिंगची बरोबरी केली आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक (८) कसोटी सामने जिंकण्याच्या पॉन्टिंगच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. (Virat Kohli Record)

७. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कसोटी क्रिकेटमध्ये २०० बळी घेणारा देशातील पाचवा वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्यांच्या आधी कपिल देव, जवागल श्रीनाथ, झहीर खान आणि इशांत शर्मा यांनी हा मान मिळवला आहे.

८. भारताने २०२१ या कॅलेंडर वर्षात (ब्रिस्बेन, लॉर्ड्स, ओव्हल, सेंच्युरियन) आशियाबाहेर चार कसोटी जिंकण्याची दुसरी वेळ आहे. असं याआधी २०१८ मध्ये घडले होते (जोहान्सबर्ग, नॉटिंगहॅम, अॅडलेड, मेलबर्न).

९. दक्षिण आफ्रिकेत भारताचा कसोटी विजय

१२३ धावांनी विजय : जोहान्सबर्ग २००६/०७
८७ धावांनी विजय : डर्बन २०१०/११
६३ धावांनी विजय : जोहान्सबर्ग २०१७/१८
११३ धावांनी विजय : सेंच्युरियन २०२१/२२

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news