आम्‍हाला पॅलेस्टाईनमधील निष्पाप लोकांची काळजी : UN सुरक्षा परिषदेत भारताची स्‍पष्‍टोक्‍ती

संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेतील बैठकीत बाेलताना भारताचे उप-स्थायी प्रतिनिधी आर रवींद्र.
संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेतील बैठकीत बाेलताना भारताचे उप-स्थायी प्रतिनिधी आर रवींद्र.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पॅलेस्‍टाईनमधील निर्दोष नागरिकांच्‍या मृत्यूबद्दल चिंता आणि शोक व्यक्त करणारे पहिले जागतिक नेते होते. संकटाच्‍या काळात भारत इस्‍त्रायलच्‍या पाठीशी उभा आहे. तसेच आम्‍हाला पॅलेस्टाईनमधील निष्पाप लोकांची काळजी आहे. दहशतवादाचा सामना करणाऱ्या पॅलेस्‍टाईनच्‍या नागरिकांबाबत आमची संवेदना आहे,असे भारताने संयुक्‍त राष्‍ट्र परिषदेत स्‍पष्‍ट केले . ( India at UN Security Council on Israel-Hamas war )

संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेतील बैठकीत भारताचे उप-स्थायी प्रतिनिधी आर रवींद्र यांनी नमूद केले की, "ढासळत चाललेली सुरक्षा परिस्थिती आणि संघर्षातील नागरिकांच्या जीवनाबद्दल भारत चिंतित आहे. इस्रायलवरील हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निर्दोष लोकांच्या मृत्यूबद्दल चिंता आणि शोक व्यक्त करणारे पहिले जागतिक नेते होते. संकटाच्या या काळात भारत इस्रायलच्या पाठीशी उभा आहे. दहशतवाद्यांचा सामना करणाऱ्या पॅलेस्‍टाईनमधील लोकांप्रती आमची संवेदना आहे. जखमींच्या लवकरात लवकर बरे व्हावे, अशी आमची इच्छा आहे. दोन्ही बाजूच्या नागरिकांनी काळजी घ्यावी.आपण महिला, लहान मुले आणि वृद्धांचा विचार केला पाहिजे."

भारत पॅलेस्टाईनला मदत पाठवत राहिल : India at UN Security Council on Israel-Hamas war

भारत इस्रायलच्या पाठीशी उभा आहे. तसेच पॅलेस्टाईनमधील नागरिकांबाबत आमची संवेदना आहे. रताने पॅलेस्टाईनच्‍या लोकांना औषधे आणि खाद्यपदार्थांसह ३८ टन सामुग्री पाठवली आहे. भारताने नेहमीच दोन देशांच्या समाधानाचे समर्थन केले आहे. या आव्हानात्मक काळात भारत पॅलेस्टाईनच्या लोकांना मानवतावादी मदत पाठवत राहील. अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहनही आर रवींद्र यांनी केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news