इंडिया आघाडीला धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र करावे लागेल: सीताराम येचुरी

इंडिया आघाडीला धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र करावे लागेल: सीताराम येचुरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्रित करून काम करावे लागणार आहे. प्रत्येक राज्यातील राजकीय परिस्थिती वेगवेगळी असते. यावर चर्चा करून आघाडीतील घटक पक्षांच्या जागा वाटपावर तोडगा काढला जाईल. यापुढे आघाडीची खलबते आणि बैठका होत राहणार आहेत, अशी माहिती सीपीआयचे (एम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी आज (दि.१३) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची पहिली बैठक आज शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी होत आहे.  लोकसभा निवडणुकीची तयारी आणि आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधकांच्या संयुक्त प्रचार सभांबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मोदी सरकार आणि भाजपच्या विरोधात सुरू करण्यात येणाऱ्या मोहिमेवरही या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे समजते.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news