IND vs WI T20 : विंडिजचे भारतासमोर 150 धावांचे लक्ष्य, पूरन-पॉवेलचे अर्धशतक हुकले

IND vs WI T20 : विंडिजचे भारतासमोर 150 धावांचे लक्ष्य, पूरन-पॉवेलचे अर्धशतक हुकले

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs WI T20 : वेस्ट इंडिज विरुद्धच्या भारत यांच्यात पहिला टी-20 सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 20 षटकात 6 गडी गमावून 149 धावा केल्या असून भारताला विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य दिले आहे. विंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने सर्वाधिक 48 आणि निकोलस पुरन याने 41 धावा केल्या. भारताकडून युझवेंद्र चहल-अर्शदीप सिंगने 2, हार्दिक पंड्या-कुलदीपने 1-1 विकेट घेतली. तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर भारतीय संघ टी-20 मालिकेतही धमाकेदार कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

भारतीय संघ :
शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज संघ :
ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स (विकेटकीपर), निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल (कर्णधार), जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकील हुसेन, ओबेद मॅककॉय आणि अल्झारी जोसेफ.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news