पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिका विरूध्दच्या वन डे मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची धुरा शिखर धवन याला सोपवली आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय ) दिली. या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. ६ ऑक्टोंबरपासून भारत वि. आफ्रिकेदरम्यान तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. (IND vs SA ODIs)
शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड़, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, ईशान किशन, संजू सैसमन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज आणि दीपक चहर (IND vs SA ODIs)
शिखर धवन याने यापूर्वीही भारतीय क्रिकेट संघाची कर्णधारपदाची धुरा संभाळली आहे. मागील वर्षी श्रीलंकामध्ये झालेल्या वन डे आणि टी-20 मालिकेसाठी शिखरच कर्णधार होता. यानंतर वेस्टइंडिज विरूध्दच्या वन डे मालिकेसाठीही त्याने टीम इंडियाला शानदार विजय मिळवून दिला होता. झिम्बाव्वे विरूध्दच्या मालिकेतही त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने निर्विवाद विजय मिळवला होता.
युवा खेळाडूंना मिळाली संधी (IND vs SA ODIs)
एकदिवसीय मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आल्याने युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. श्रेयस अय्यर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर देशांर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, शाहबाज अहमद यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. (IND vs SA ODIs)