Rabada vs Rohit Sharma : रबाडाने रोहित शर्माला बाद करून रचला ‘हा’ विक्रम!(Video)

Rabada vs Rohit Sharma : रबाडाने रोहित शर्माला बाद करून रचला ‘हा’ विक्रम!(Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rabada vs Rohit Sharma : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून सेंच्युरियनमध्ये सुरू झाला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला. यावेळी खेळपट्टी बराच वेळ झाकली गेली, त्यामुळे त्यात ओलावा होता. याचा फायदा घेण्यासाठी बावुमाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकन गोलंदाजांनीही कर्णधाराचा निर्णय योग्य ठरव भारताची अव्वल फळी उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. इतकेच नाही तर वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने भारतीय कर्णधार रोहित शर्माला बाद करून नवा विक्रम रचला.

रबाडाने रोहित शर्माला पॅव्हेलियनमध्ये पाठवले (Rabada vs Rohit Sharma)

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी, टी20 आणि वनडे) सर्वाधिक वेळा न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊदीने बाद केले आहे. पण आता द. आफ्रिकेच्या कागिसो रबाडा किवी गोलंदाजाला मागे टाकण्याचा पराक्रम केला आहे. साऊदीने 12 वेळा रोहित शर्माला बाद केले आहे, तर रबाडाने हिटमॅनची विकेट 13 व्यांदा घेतली आहे. श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजने रोहितला 10 वेळा तर ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने 9 वेळा बाद केले आहे. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने रोहितची आठ वेळा विकेट घेतली आहे. या सामन्यात आऊट होण्यापूर्वी रोहित शर्माने 14 चेंडूत 5 धावा केल्या आणि यात फक्त एका चौकाराचा समावेश आहे.

द. आफ्रिकेच्या मा-यापुढे टीम इंडियाची टॉप ऑर्डर कोलमडली

टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल सलामीला आले. संघाची धावसंख्या केवळ 13 असताना रोहित शर्मा आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर सर्व आशा शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांच्यावर होत्या. पण 23 धावांवर यशस्वी जैस्वालही (37 चेंडूत 17 धावा) बाद झाला. त्यानंतर लगेच 24 धावांवर गिल (1) माघारी परतला. अशाप्रकारे 25 धावा पूर्ण होण्याआधीच भारतीय संघाचे आघाडीचे तीन फलंदाज बाद झाल्याने भारतीय संघ अडचणीत सापडला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news