पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs SA 3rd T20 : रिली रॉस्सोचे (नाबाद 100) शतक व क्विंटन डिकॉकच्या (68) अर्धशतकाच्या बळावर द. आफ्रिकेने तिसर्या टी-20 सामन्यात भारतावर 49 धावांनी विजय मिळविला. मात्र, तीन सामन्यांची मालिका टीम इंडियाने 2-1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलिया व द. आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकून वाढलेल्या आत्मविश्वासाने 'रोहितसेना' आता टी-20 वर्ल्डकपसाठी लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.
विजयासाठी 228 धावांचे टार्गेट नजरेसमोर ठेवून उतरलेल्या भारताने 18.3 षटकांत सर्वबाद 178 काढल्या. पंतबरोबर सलामीला उतरलेला रोहित शून्यावर रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला. श्रेयस (1) पार्नेलच्या गोलंदाजीवर पायचित झाला. फटकेबाजीच्या प्रयत्नात पंत (27) परतल्याने भारताची 3 बाद 45 अशी स्थिती झाली. त्यानंतर दिनेश कार्तिक 21 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकारांसह 46 धावा काढून बाद झाला. आक्रमक सूर्यकुमारही 8 धावांवर परतला. ( IND vs SA 3rd T20)
यामुळे भारताची 5 बाद 86 धावा, अशी बिकट स्थिती झाली. संघाचे शतक पूर्ण होताच हर्षल पटेल (17) बाद झाला. त्यापाठोपाठ अक्षर पटेल (9), आर. अश्विन (2) परतले. यामुळे भारताची 8 बाद 120 अशी दयनीय स्थिती झाली. शेवटच्या 30 चेंडूंत 86 धावांची गरज होती. थोडा प्रतिकार करून दीपक चहर (31) नवव्या विकेटच्या रूपात बाद झाला. सिराजला (5) बाद करून प्रिटोरियसने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. प्रिटोरियसने तीन विकेटस् घेतल्या.
तत्पूर्वी, द. आफ्रिकेने 20 षटकांत 3 बाद 227 धावा काढल्या. डिकॉक व कर्णधार बवुमा यांनी डावास सुरुवात केली. मात्र, उमेश यादवने बवुमाला (3) रोहितकरवी झेलबाद करत पहिला धक्का दिला. डिकॉकने आपले अर्धशतक 33 चेंडूंत 4 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने पूर्ण केले. अय्यरच्या अचूक फेकीवर पंतने डिकॉकला धावचित केले. डिकॉकने (68) दुसर्या विकेटसाठी 90 धावांची भर घातली. यामुळे द. आफ्रिकेने 20 षटकांत 3 बाद 227 अशी भक्कम धावसंख्या उभारली. रॉस्सोने अवघ्या 48 चेंडूंत 7 चौकार व 8 षटकारांसह आपले शतक पूर्ण केले. तर मिलर 19 धावांवर नाबाद राहिला.
IND vs SA 3rd T20 :
द. आफ्रिका : 20 षटकांत 3 बाद 227 धावा (रॉस्सो नाबाद 100, डिकॉक 68, दीपक चहर, उमेश यादव प्रत्येकी एक विकेट.)
भारत : 18.3 षटकांत सर्वबाद 178 (कार्तिक 46, दीपक चहर 31, पंत 27, प्रिटोरियस 26 धावांत 3 विकेटस्.)
अधिक वाचा :